बेशिस्त पार्किंग करणा-यांवर कारवाई

By Admin | Updated: February 17, 2015 01:25 IST2015-02-17T01:25:25+5:302015-02-17T01:25:25+5:30

खामगाव पंचायत समिती पािरसरात बेशिस्त पार्किंग वाहनावर कारवाई, वाहनातील सोडल्या जाते हवा.

Action on unskilled parking people | बेशिस्त पार्किंग करणा-यांवर कारवाई

बेशिस्त पार्किंग करणा-यांवर कारवाई

खामगाव (जि. बुलडाणा ): येथील पंचायत समितीमध्ये गत काही दिवसांपासून बेशिस्त वाहन पार्किंग करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे पंचायत समिती प्रशासनाने फलकसुद्धा लावले; मात्र तरीही दखल न घेणार्‍यांच्या वाहनाची हवा सोडण्याची कारवाई करण्यात येत आहे.
तालुक्यातील महत्त्वाची स्वराज्य संस्था म्हणजे पंचायत समिती होय. त्यामुळे तालुक्यातील शेकडो नागरिक तसेच अधीनस्त कर्मचारी कामानिमित्ताने पंचायत समितीमध्ये हजेरी लावतात. त्यामुळे गर्दी असते. तर या गर्दीत येथे येणार्‍यांकडून आपले वाहन व्यवस्थितरित्या ठरलेल्या जागेवर उभे न करता मनमानीपणे रस्त्यातच उभे करण्यात येते. त्यामुळे पंचायत समितीमध्ये जाण्यासाठी रस्ता नसतो. या बाबीची दखल घेत पंचायत समिती प्रशासनाकडून वाहन येथे उभे करावे, वाहन येथे उभे करू नये, असे फलकसुद्धा लावण्यात आले आहेत; मात्र तरीही येणार्‍यांकडून या फलकाकडे दुर्लक्ष करून दुसर्‍यांना होणार्‍या त्रासाची जाणीव न होता रस्त्यातच वाहन उभे केले जाते. त्यामुळे पंचायत समितीच्या कर्मचारी व अधिकार्‍यांकडून वाहन हटविण्याचे सांगण्यात येते; मात्र प्रतिसाद न दिल्यास हवा सोडण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेमुळे थोड्या फार प्रमाणात शिस्त लागण्यास सुरुवात झाली आहे. तर अनेक वेळा जागा नसल्याचे सांगण्यात येऊन वादसुद्धा उद्भवत आहेत. एकूणच पंचायत समितीचा आवार कमी असल्याने त्यातच वाहने वाढल्याने व जागा असतानाही बेशिस्तपणे कोठेही वाहन उभे करणार्‍यांमुळे ही कारवाई सुरू झाली आहे.

Web Title: Action on unskilled parking people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.