वीज चाेरी करणाऱ्या २० जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:36 IST2021-02-05T08:36:06+5:302021-02-05T08:36:06+5:30
धामणगाव धाडः धामणगाव, डोमरूळ परिसरात महावितरणच्या अधिकाऱ्यांनी धाड सत्र राबवून वीज चाेरी करणाऱ्या २० जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली. ...

वीज चाेरी करणाऱ्या २० जणांवर कारवाई
धामणगाव धाडः धामणगाव, डोमरूळ परिसरात महावितरणच्या अधिकाऱ्यांनी धाड सत्र राबवून वीज चाेरी करणाऱ्या २० जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली.
परिसरातील अनेक गावांमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून विद्युत मीटरमध्ये छेडछाड करणे. आकडे टाकणे, फ्यूज उडणे, राेहित्र जळणे आदी प्रकार वाढले हाेते. वारंवार येणाऱ्या तक्रारीची दखल घेत सहाय्यक अभियंता अजय खडसे यांनी शोध मोहीम राबवत वीज चोरीला आळा बसावा यासाठी उपरोक्त गावात १ फेब्रुवारी रोजी सकाळी गावात फिरून मीटर तपासणी केली. यावेळी मीटरमध्ये छेडछाड केल्याचे आढळून आले. दरम्यान २० वीज चोरट्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली असून दंड न भरल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. या कारवाईत सहाय्यक अभियंता अजय खडसे यांचेसह एस.के. काकडे ,गजानन वाघ, किशोर साळवे ,शेख एलियास ,शेख हसन, आहेर ,अंकुश सोनवणे ,गायकवाड, धंदर यांनी सहभाग घेतला.
काेट
उपकेंद्राअंतर्गत जर कुठल्याही गावात वीज चोरी होत असल्याची माहिती मिळाल्यास कुणाचीही गय करता येणार नाही. दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
- प्रतीक्षा गोलेच्छा,कनिष्ठ अभियंता धामणगाव धाड