मिरवणुकीमध्ये हाणामारी
By Admin | Updated: November 22, 2014 01:07 IST2014-11-22T01:07:32+5:302014-11-22T01:07:32+5:30
अमडापूर येथील घटना, २३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

मिरवणुकीमध्ये हाणामारी
अमडापूर (बुलडाणा) : एकाच समाजातील दोन गटात जुन्या वादावरून २0 नोव्हेंबर रोजी टिपू सुलतान यांच्या मिरवणुकीत हाणामारी झाल्याची घटना घडली.
याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटाच्या परस्परविरोधी तक्रारीवरून २३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत उबेद पटेल शब्बीर पटेल यांनी पो.स्टे.ला फिर्याद दिली की, २0 नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास टिपू सुलतान मिरवणुकीमध्ये असताना शे. जुनेद शे. इस्माईल, शे. इस्माईल शे. इस्त्राईल, शेख इस्त्राईल शे. लतीफ, अलियार खान अन्सार खान, शाहरुख खान अन्सारखान, फारुख खान अन्सार खान, अफजल सईद जमादार, शे. अमीन शे. इस्माईल व इतर दोन ते तीन जणांनी मागील वादातून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली व घरासमोर येऊन गैरकायद्याची मंडळी जमवून लाठय़ाकाठय़ांनी नासीर पटेल यांच्या डोक्यावर मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले.
तर शे. जुनेद शे. युसूफ यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, फरजानबी शब्बीर पटेल, फरजानबी शगीर पटेल, अफसरखान, नजमाबी अफसरखा, रहेमुनबी बशीर पटेल, तबस्सुम कुस्तुम पटेल, शे. उस्मान शे. जुनेद, नासीर पटेल, जुबेर पटेल, उबेद पटेल, रईस पटेल, साबीद पटेल सर्व यांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.