खामगावात क्षुल्लक कारणावरुन हाणामारी
By Admin | Updated: November 11, 2014 23:59 IST2014-11-11T23:59:23+5:302014-11-11T23:59:23+5:30
सहा व्यक्तींविरूद्ध गुन्हा दाखल

खामगावात क्षुल्लक कारणावरुन हाणामारी
खामगाव (बुलडाणा) : क्षुल्लक कारणावरुन दोन कुटुंबात हाणामारी झाल्याची घटना काल स्थानिक बाळापूर फैल भागात घडली. याप्रकरणी पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारीवरुन सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत नगीना सुनील गुळवे (वय ३६) या महिलेने पो.स्टे.ला फिर्याद दिली की, काल सायंकाळी घरासमोर बसली असताना संजय तायडे, भारत जाधव, प्रदीप गवई व सोनु तायडे रा.बाळापूर फैल यांनी माझ्या सुनेला वारंवार फोन का करते, या कारणावरुन वाद घालून मारहाण केली; तसेच चंद्रकला तेलंग ही महिला वाद सोडविण्यास आली असता तिला सुद्धा मारहाण केली. या आशयाच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी उपरोक्त चार जणांविरुद्ध कलम ३२४, ५0४, ५0६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. त्याचप्रमाणे दुसर्या कुटुंबातील महिलेने फिर्यादीवरून तेलंग व श्याम तायडे या दोघांविरुद्ध कलम ३५४, ३२४, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.