रेतीची अवैध वाहतूक करणा-यांवर कारवाई

By Admin | Updated: June 11, 2017 02:21 IST2017-06-11T02:21:14+5:302017-06-11T02:21:14+5:30

कोट्यवधी रुपयांचा शासनाचा महसूल बुडत असल्याचे चित्र

Action on illegal transporters of sand | रेतीची अवैध वाहतूक करणा-यांवर कारवाई

रेतीची अवैध वाहतूक करणा-यांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार: महसूल अधिकार्‍यांच्या आर्थिक हितसंबंधामुळे तालुक्यातून मोठय़ा प्रमाणात दररोज लाखो रुपयांची अवैद्य रेती वाहतूक होऊन कोट्यवधी रुपयांचा शासनाचा महसूल बुडत असल्याचे चित्र आहे.
कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणर्‍या रेती माफियांच्या मुजोरीपणामुळे अनेक अपघात घडून निष्पाप जीवांना प्राणाला मुकावे लागलेले आहे. तरीही महसूलचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. अखेर उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्‍वर वैंजने यांनी कारवाई करीत रेती वाहनधारकांना एकाच दिवसात १ लाख ७६ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
वैंजने यांनी लोणार व सुलतानपूर मार्गावर ८ जून रोजी विशेष मोहीम राबवून अवैद्य रेती वाहतूक करणारे अंकुश झळके यांचे एम.एच.३६.३८९, उकळी येथील विनोद सासवडकर यांचे एम.एच.२८.एबी.९२२२, रामदास खिल्लारे यांचे एम. एच. २८.एबी.१४८४ , शेख जावेद शेख रशीद यांचे एम.एच.0४.सी.११४४ ही वाहने जप्त केले. जप्त केलेले वाहन लोणार पोलीस स्टेशनला लावून महसूल विभागाला माहिती देण्यात आली. त्यानंतर महसूल विभागाने एकूण १ लाख ७६ हजार रुपये एवढा दंड वाहनधारकांवर आकारला आहे. पोलीस अधिकारी रामेश्‍वर वैंजने यांनी केलेल्या कारवाईमुळे रेती माफियाला चांगलाच चाप बसला. रेती माफियांच्या मुजोरीपणामुळे अनेक अपघात घडून निष्पाप जीवांना प्राणाला मुकावे लागलेले आहे. तरीही आर्थिक हितासाठी महसूल अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे अखेर पोलीस उपविभागीय अधिकारी रामेश्‍वर वैंजने यांनी केलेल्या कारवाईमुळे एकाच दिवसात १ लाख ७६ हजार रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत गेला, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

Web Title: Action on illegal transporters of sand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.