उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2017 01:01 IST2017-04-13T01:01:13+5:302017-04-13T01:01:13+5:30

देऊळगाव राजा : शहरामध्ये उत्पादन शुल्क विभागाने शहरामध्ये तीन ठिकाणी छापा टाकून तीन जणांविरुद्ध कारवाई केली.

Action on illegal liquor vendors from the Department of Excise Department | उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई

उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई

मोठ्या विक्रेत्यांना अभय, किरकोळ विक्रेत्यांना केले लक्ष्य
देऊळगाव राजा : शहरामध्ये उत्पादन शुल्क विभागाने शहरामध्ये तीन ठिकाणी छापा टाकून तीन जणांविरुद्ध कारवाई केली. अधिकाऱ्यांनी केवळ किरकोळ दारू विक्रेत्यांना लक्ष्य केले असून, मोठ्या विक्रेत्यांना मात्र अभय दिले आहे.
‘देऊळगाव राजात अवैध दारू विक्री’ या मथळ्याखाली १० एप्रिल रोजी लोकमतने बातमी प्रकाशित केली होती. सदर बातमीची दखल घेत कारवाई करण्यात आली. उत्पादन शुल्क विभागाने अधीक्षक एस.एल. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक तुषार लव्हाळे आणि प्रदीप देशमुख यांनी देऊळगाव राजा शहरामध्ये दारू विक्रेत्यांवर तीन ठिकाणी छापे टाकून गणेश सखाराम मोरे, सतीश तुकाराम खुपसे तथा सर्जेराव हरिभाऊ खरात यांच्याकडून अवैध दारूसाठा किंमत ३९८० रुपयांचा माल जप्त केला. तसेच त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ड) प्रमाणे कारवाई केली. शहर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्रीचा गोरखधंदा करणारा एकही मोठा दारू माफिया त्यांना सापडला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबत दुय्यम निरीक्षक तुषार लव्हाळे यांनी केवळ दोनच कर्मचारी असल्याने कारवाई करण्याबाबत अडचणी येत असल्याचे सांगितले.

Web Title: Action on illegal liquor vendors from the Department of Excise Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.