शेताच्या वादावरून हाणामारी
By Admin | Updated: October 14, 2014 00:24 IST2014-10-14T00:24:20+5:302014-10-14T00:24:20+5:30
करतवाडी येथील घटना.

शेताच्या वादावरून हाणामारी
अमडापूर (बुलडाणा) : अमडापूर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या करतवाडी येथे शेताच्या वादातून हाणामारीच्या घटनेत एक जण जखमी झाल्याची घटना १२ ऑक्टोबर रोजी घडली. या प्रकरणात पोलिसांनी ५ जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
तुषार श्रीकृष्ण म्हळसणे (वय२४) रा.करतवाडी ह.मु.उंद्री हा त्याचा आईसह घाणमोड शिवारातील गट नं.२६ मधील शेतात सोयाबीन व तूर पिकाला पाणी देण्याकरिता गेला असता शरद म्हळसणे, जया म्हळसणे, ज्योती म्हळसणे, गुंफाबाई म्हळसणे (करतवाडी) व सोभागे (रताळी) यांनी संगनमत करून त्याच्या शेत ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना मनाई केली असता त्यांनी म्हळसणे कुटुंबियांना शिवीगाळ करून दगडाने मारहाण करून जखमी केले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. श्रीकृष्ण म्हळसणे याच्या तक्रारीवरून अमडापूर पोलिसांनी शरद म्हळसणे व अन्य चार जणांविरूद्ध १४३, १४७, १४९, ३२४, ५0४ भादंवि तसेच १३५ बीपी अँक्टप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.