पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचारावर कारवाई करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 23:51 IST2017-07-31T23:45:09+5:302017-07-31T23:51:44+5:30

डोणगाव : बुलडाणा जिल्ह्यातील १४२० गावांतील शासकीय नळ पाणीपुरवठा योजनेमधील भ्रष्टाचारावर १५ आॅगस्टपर्यंत कार्यालयामार्फत कारवाई करावी; अन्यथा जुन्या वस्तूचा अहेर सप्रेम भेट देऊन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सुबोध सावजी यांनी कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा जिल्हा परिषद बुलडाणा यांना दिला.

Action on corruption in the water supply scheme | पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचारावर कारवाई करा!

पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचारावर कारवाई करा!

ठळक मुद्दे१५ आॅगस्टनंतर अहेर आंदोलनसुबोध सावजी यांचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
डोणगाव : बुलडाणा जिल्ह्यातील १४२० गावांतील शासकीय नळ पाणीपुरवठा योजनेमधील भ्रष्टाचारावर १५ आॅगस्टपर्यंत कार्यालयामार्फत कारवाई करावी; अन्यथा १५ ते २२ आॅगस्ट या कालावधीत कार्यालयात फ्लेक्स, कॅरोना, रेडचिफ इत्यादी कंपनीच्या जुन्या वस्तूचा अहेर सप्रेम भेट देऊन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सुबोध सावजी यांनी शनिवारला कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा जिल्हा परिषद बुलडाणा यांना पत्राद्वारे दिला आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील १४२० गावांत शासकीय नळयोजनेची कामे झालेली आहेत व सुरू आहेत. दुरुस्तीची कामेही झालेली आहेत. यामध्ये भ्रष्टाचार आहे, तो दूर करण्यासाठी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी बुलडाणा जिल्हा शासकीय नळ पाणीपुरवठा भ्रष्टाचार निर्मूलन समिती गठित केली आहे. यामध्ये उपाध्यक्ष म्हणून संग्रामपूर येथील वा.रा. पिसे, देऊळगाव राजा येथून प्रदीप नागरे, चिखली येथून प्रमोद पाटील, तर शेगाव येथून अमित जाधव, खामगाव येथून अंबादास पाटील, मोताळा येथून सुनील कोल्हे, लोणार येथून सुनीता भांड, संग्रामपूर येथून राजू राठोड, शेगाव येथून संजय तारापुरे, जळगाव जामोद येथून रमेशचंद्र घोलप, मोताळा येथून रवि पाटील, लोणार येथून खानसेठ, सिंदखेड राजा येथून गणेश राजे जाधव, तर मेहकर येथून गणेश जुनघरे, नांदुरा येथून गजानन वडतकर, लोणार येथून खुशालराव गायकवाड यांची समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून २८ जुलै ते १० आॅगस्टपर्यंत जिल्ह्यातील संपूर्ण शासकीय नळ पाणीपुरवठा भ्रष्टाचाराची माहिती संकलित करण्यात येत आहे. जिल्ह्यातील १४२० गावांमध्ये किमान २००० कोटींचा भ्रष्टाचार आहे. त्यावर १५ आॅगस्ट २०१७ पर्यंत कारवाई न केल्यास माजी मंत्री सुबोध सावजी यांच्या नेतृत्वात अहेर आंदोलन करण्याचा इशाराही समितीच्यावतीने देण्यात आला आहे.

Web Title: Action on corruption in the water supply scheme