लोणारमध्ये बोगस डॉक्टरवर कारवाई

By Admin | Updated: October 28, 2016 02:36 IST2016-10-28T02:36:37+5:302016-10-28T02:36:37+5:30

पदवी प्रमाणपत्र तसेच रुग्ण नोंद वही आढळून आली नाही

Action on bogus doctor in Lonar | लोणारमध्ये बोगस डॉक्टरवर कारवाई

लोणारमध्ये बोगस डॉक्टरवर कारवाई

लोणार, दि. २६- शहरातील विश्‍वास मुळव्याध भंगदर क्लिनिकच्या कृषणपद निशिकांत विशवास या डॉक्टरवर गुरूवारी वैद्यकीय अधिकार्‍यांनी कारवाई केली.
शहरातील विश्‍वास मुळव्याध भंगदर क्लिनिकची तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अनंत पबितवार व वैद्यकिय अधिकारी डॉ.जायभाये यांनी पाहणी केली असता त्यांना दर्शनी भागात पदवी प्रमाणपत्र लावलेले आढळून आले नाही. तसेच रुग्ण नोंद वही आढळून आली नाही. अँलोपाथी गोळ्यांची नावे लिहिलेली चिठ्ठी आढळून आली,त्यामुळे त्यांनी कारवाई करून साहित्य जप्त केले. कृषणपद निशिकांत विशवास या डॉक्टरवर कारवाई करण्यासाठी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केल्याचे डॉ.अनंत पबितवार यांनी सांगितले.

Web Title: Action on bogus doctor in Lonar