पाणी उपसा करणा-यांविरुद्ध कारवाई

By Admin | Updated: November 20, 2015 02:27 IST2015-11-20T02:27:31+5:302015-11-20T02:27:31+5:30

मेहकर तालुक्यात कोराडी प्रकल्प व तलावातून अवैधरीत्या पाणी उपसा.

Action against water peddlers | पाणी उपसा करणा-यांविरुद्ध कारवाई

पाणी उपसा करणा-यांविरुद्ध कारवाई

मेहकर (जि. बुलडाणा): मेहकर तालुक्यातील अनेक गावांमध्ये कोराडी प्रकल्प व तलावातून मोठय़ा प्रमाणावर अवैधरीत्या पाणी उपसा सुरू असून, अवैध पाणी उपसा करणार्‍यांवर पोलीस कारवाई करण्याची मोहीम तहसील व पाटबंधारे विभागाने घेतली आहे. मेहकर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाझर तलाव व कोराडी मध्य प्रकल्पातून अवैधरीत्या पाणी उपसा सुरू असल्याच्या तक्रारी तहसीलदार, पंचायत समिती, पाटबंधारे विभाग यांना मिळत असल्याने या अवैधरीत्या पाणी उपसा करणार्‍यांना ग्रामपंचायतच्या माध्यमातून नोटीससुद्धा बजावण्यात आल्या आहे. सर्रासपणे पाणी उपसा होत असल्याचे भविष्यात मोठय़ा प्रमाणावर भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याने अवैधरीत्या पाणी उपसा करणार्‍याविरुद्ध पोलीस कारवाई करण्यात येणार आहे. तालुक्यातील देऊळगाव माळी, वरोडी, गुंज, शेलगाव काकडे, साखरखेर्डा, ब्रह्मपुरी, विवेकानंद नगर या ग्रामपंचायतच्या सरपंच, सचिव यांना पत्र देऊन संबंधित अवैधरीत्या पाणी उपसा करणार्‍याविरुद्ध कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शासनाने पाझर तलाव, कोराडी मध्यम प्रकल्प आदीवरून पाणी उपसा संदर्भात कडक सूचना दिल्या असून, भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, म्हणून जिल्हाधिकार्‍यांना सर्व अधिकार देण्यात आले आहे. आधी पिण्यासाठी पाणी राखून ठेवावे नंतरच सिंचनासाठी पाणी असे शासनाचे आदेश आहेत. मेहकर उपविभागातील एकूण २९ लघुप्रकल्प असून, त्यात अत्यंत कमी प्रमाणावर पाणीसाठा उपलब्ध आहे. यामध्ये कोराडी प्रकल्पात 0.८१ दलघमी म्हणजेच ५.३६ टक्के इतकाच जलसाठा राहिला आहे. तर घनवटपूर प्रकल्पात 0.३८ दलघमी, पळशी 0.३९ दलघमी, कळंबेश्‍वर 0.४५ दलघमी, जागदरी १.0८ दलघमी, चोरपांग्रा 0.१२ दलघमी, खंडाळा 0.२६ दलघमी, खळेगाव 0.३५ दलघमी, सावंगीमाळी एक 0.१७ दलघमी, टिटवी 0.८७ दलघमी, शिवणीजाट 0.१८ दलघमी, गंधारी 0.१८ दलघमी, पिंपळनेर 0.८७ दलघमी, देऊळगाव कुंडपाळ 0.0९ दलघमी, तांबोळा 0.३३ दलघमी, गुंधा १.१९ दलघमी, पिंपरखेड 0.२९ दलघमी, गारखेड 0.५४ दलघमी, तांदूळवाडी 0.६0 दलघमी, दुसरबीड 0.९९ दलघमी, देवखेड 0.८७ दलघमी, निमगाव वायाळ तलावात १.१६ दलघमी इतका कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच कळपविहिर, सावंगीमाळी दोन, अंभोरा, मांडवा, केशवशिवणी या प्रकल्पामधील पाणीसाठा मृत जलसाठय़ाखाली पोहचला आहे. तर चायगाव येथील तलाव कोरडा ठणठणीत पडला आहे.

Web Title: Action against water peddlers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.