उंद्री येथे अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:35 IST2021-05-12T04:35:51+5:302021-05-12T04:35:51+5:30

उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अमित वानखेडे व पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या पथकाला उंद्री येथील ...

Action against illegal drug dealers at Undri | उंद्री येथे अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई

उंद्री येथे अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई

उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अमित वानखेडे व पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या पथकाला उंद्री येथील हॉटेल साईनाथमध्ये अवैधरीत्या विनापरवाना दारूविक्री हाेत असल्याची माहिती मिळाली़ या माहितीच्या आधारे पाेलिसांनी धाड टाकून ४२ हजार ८०० रुपयांचा माल जप्त केला़ यावेळी हॉटेलमालक आरोपी संतोष अशोक टेलरकर (वय ३२, रा. उंद्री) हा फरार होण्यात यशस्वी झाला आहे. या कारवाईमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाचे सुधाकर प्रभाकर तारस्के, राठोड व अमडापूर पोलिसांनी संयुक्त कारवाई केली़ आराेपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास अमडापूर पाेलीस करीत आहेत़

Web Title: Action against illegal drug dealers at Undri