नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २० जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:34 IST2021-04-25T04:34:05+5:302021-04-25T04:34:05+5:30

गत काही दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या वाढतच असल्याने, शासनाने संचारबंदी लागू केली आहे. सकाळी ११ नंतर फिरण्यास बंदी घातलेली ...

Action against 20 people violating the rules | नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २० जणांवर कारवाई

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २० जणांवर कारवाई

गत काही दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या वाढतच असल्याने, शासनाने संचारबंदी लागू केली आहे. सकाळी ११ नंतर फिरण्यास बंदी घातलेली असतानाही लाेणार शहरात अनेक जण विनाकारण फिरतात. त्यामुळे २४ एप्रिल राेजी मंठा नाक्यावर ठाणेदार रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय भारत बोर्डे, पोलीस कर्मचारी सुरेश काळे, गजानन ठाकरे, वाहतूक पोलीस सीमा उन्हाळे यांनी वाहनधारकावर विनामास्क, फिजिकल डिस्टन्सिंग व संचारबंदीचे उल्लंघन केल्यामुळे दंडात्मक कारवाई करून ४ हजार रुपयांचा दंड वसूल केला.

शासनाने ‘ब्रेक द चेन’चे आदेश जारी केले आहेत. संचारबंदीच्या नियमाचे काटेकोरपणे नागरिकांनी पालन करावे. विनाकारण घराबाहेर पडू नये. बाहेर पडताना कोविड नियमावली मास्कचा वापर आवर्जून करावा, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, अन्यथा नियमांचे उलंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणार असल्याचे ठाणेदार रवींद्र देशमुख यांनी सांगितले.

Web Title: Action against 20 people violating the rules