जिल्ह्यात १३५ गुटखा विक्रेत्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:24 IST2021-06-26T04:24:36+5:302021-06-26T04:24:36+5:30

बुलडाणा : स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांनी तीन दिवस विशेष मोहीम राबवत जिल्ह्यात विविध ठिकाणी छापेमारी केली. यामध्ये ...

Action against 135 gutka sellers in the district | जिल्ह्यात १३५ गुटखा विक्रेत्यांवर कारवाई

जिल्ह्यात १३५ गुटखा विक्रेत्यांवर कारवाई

बुलडाणा : स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांनी तीन दिवस विशेष मोहीम राबवत जिल्ह्यात विविध ठिकाणी छापेमारी केली. यामध्ये १३५ गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येऊन १२ लाख १४ हजार ५५३ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे़

पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन प्रमुखांनी आपापल्या हद्दीत तर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात २२ जून ते २४ जूनदरम्यान गुटखा विरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत एलसीबीच्या वेगवेगळ्या पथकांनी उपरोक्त कालावधीत नांदुरा, देऊळगाव राजा, बुलडाणा, चिखली, बिबी व साखरखेर्डा पोलीस स्टेशन हद्दीत एकूण ११ ठिकाणी छापे टाकले. यामध्ये एकूण सहा लाख १६ हजार ५६६ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. तर स्थानिक पोलिसांनी त्यांच्या हद्दीत केलेल्या १२४ कारवायांमध्ये ५ लाख ९७ हजार ९६७ रुपयांचा गुटखा जप्त केला. या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेच्या सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला़

Web Title: Action against 135 gutka sellers in the district