अवैध रेती वाहतूक करणा-या ५ वाहनांवर कारवाई

By Admin | Updated: November 24, 2014 00:44 IST2014-11-24T00:22:27+5:302014-11-24T00:44:48+5:30

खामगाव येथे महसुल विभागाच्या पथकाची कारवाई, ६५ हजार रुपयांचा दंड वसूल.

Action on 5 vehicles carrying illegal sand transit | अवैध रेती वाहतूक करणा-या ५ वाहनांवर कारवाई

अवैध रेती वाहतूक करणा-या ५ वाहनांवर कारवाई

खामगाव (बुलडाणा): येथील तहसीलदार ए.एन. टेंभरे यांच्या मार्गदर्शनात महसूल विभागाच्या पथकाने आज अवैधरित्या रेतीची वाहतूक करणार्‍या ५ वाहनांना पकडून त्यांच्याकडून ६४ हजार ६00 रुपये दंड वसूल करुन शासनजमा करण्यात आला.
नांदुरा परिसरातून अवैधरित्या उत्खनन करुन खामगाव शहरात मोठय़ा प्रमाणात रेती आणल्या जात आहे. याबाबतची माहिती तहसीलदार ए.एन.टेंभरे यांना मिळाली होती. त्याआधारे आज २३ नोव्हेंबर रोजी स्थानिक महसूल विभागाच्या पथकातील मंडळ अधिकारी विजय कुळकर्णी व सूर्यकांत सातपुते आदींनी आज पाळत ठेवली असता टिप्पर क्रमांक एमएच २८ बी ८९0२, एमएच २८ एबी ७४0७, एमएच २८ एबी ७0८९, एमएच २१ एक्स १६९६ या वाहनातून अवैधरित्या रेतीची वाहतूक होत असल्याचे दिसून आले. या वाहनांमधून प्रत्येकी २ ब्रास रेती आढळून आली.
त्यामुळे त्यांच्याकडून प्रत्येकी १३ हजार ८00 रुपये याप्रमाणे ५५ हजार २00 रुपये असा दंड करण्यात आला. तसेच ट्रॅक्टर क्रमांक एमएच २८- ९२८२ या वाहनातूनही अवैधरित्या रेतीची वाहतूक होत असताना पकडण्यात आले. या ट्रॅक्टरधारकाकडून ९ हजार ४00 रूपये दंड वसूल करण्यात येवून शासनजमा करण्यात आला आहे. जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणावर अवैध रेती वाहतुक सुरू असून या माध्यमातून कोट्यावधी रूपयाची उलाढाल सुरू असताना प्रशासन मात्र बघ्याची भुमिका घेत आहे.

Web Title: Action on 5 vehicles carrying illegal sand transit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.