बुलडाणा तालुक्यात ३३० लोटा बहाद्दरांवर कारवाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 22:43 IST2017-08-02T22:42:20+5:302017-08-02T22:43:09+5:30
धाड : स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत ग्रामीण भागातील स्वच्छतेची मोहीम तीव्र करत गेल्या २० दिवसांपासून पंचायत समिती बुलडाणाच्यावतीने गावोगाव गुडमॉर्निंग पथक पाठवून उघड्यावर शौचास बसणारांवर कारवाई करत त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले.

बुलडाणा तालुक्यात ३३० लोटा बहाद्दरांवर कारवाई!
लोकमत न्यूज नेटवर्क
धाड : स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत ग्रामीण भागातील स्वच्छतेची मोहीम तीव्र करत गेल्या २० दिवसांपासून पंचायत समिती बुलडाणाच्यावतीने गावोगाव गुडमॉर्निंग पथक पाठवून उघड्यावर शौचास बसणारांवर कारवाई करत त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले.
अगदी पहाटे दिवस उजाडण्याच्या पूर्वी मोकळ्या रोडवर, शिवारात, पांदण रस्त्याने, प्रत्येक गावात ठराविक दिशेला महिला आणि माणसांची गर्दी बसलेली दिसायची. काही जण सकाळी तर काही जण सायंकाळी उघड्यावर बसल्याने त्यातून निर्माण होणारे साथीचे आजार व त्याचे परिणाम सार्वत्रिक स्वरूपाचे असतात, म्हणून शासनाने सुलभ शौचालय बांधकामास प्रोत्साहन म्हणून ग्रामीण भागात १२ हजार रु. आर्थिक अनुदान ग्रा.पं. च्या माध्यमातून वाटप करणे सुरू केले आहे. तरीही ४० टक्के नागरिक हे सर्रास उघड्यावर शौचास जातात, ही बाब चिंतनीय आहे. पंचायत समितीचे बीडीओ बाळासाहेब वाघ आणि त्यांचे कर्मचारी वर्गाने गुडमॉर्निंग पथकाची स्थापना करून बुलडाणा तालुक्यातील गावांमधून अगदी पहाटेच गावशिवारात उघड्यावर शौचास जाणाºयांवर धडक कारवाई करत लोट्यासह लोकांना पकडून पोलिसात दिले. आज बुलडाणा तालुक्यातील किमान ३० गावात गुडमॉर्निंग पथकाने फिरून ३३० जणांना पकडून पोलिसात दिले. त्यांची सुटका त्यांना न्यायालयात ३०० रु. दंड भरून मिळाली. अवघ्या २० दिवसात गुडमॉर्निंग पथकाचे प्रमुख बीडीओ बाळासाहेब वाघ यांच्याशी चर्चा केली, त्यावेळी ग्रामीण भागात उघड्यावर शौचास जाणे ही बाब सर्वश्रुत आहे. त्यात काही विशेष नाही, असाच समज नागरिकांचा आहे. मुळात उघड्यावर जाणे हे आजारास निमंत्रण देणारे व सार्वजनिक आरोग्य धोक्यात टाकणारे आहे, हे कुणी समजून घेत नाही. कित्येक जणांना पकडले की, गमतीशिर उत्तरे मिळतात. बहुतेकांजवळ शौचालय असतानाही बाहेर जातात, ही बाब बाहेर आली. त्यामुळे पथकाची कारवाई सुरूच आहे.
-