१0 वाहनांवर कारवाई
By Admin | Updated: February 18, 2015 01:08 IST2015-02-18T01:08:58+5:302015-02-18T01:08:58+5:30
लोणार येथे क्षमतेपेक्षा जास्त रेतीची वाहतूक करण्यारा कारवाई; ४0 हजाराचा दंड.

१0 वाहनांवर कारवाई
लोणार (जि. बुलडाणा) : क्षमतेपेक्षा जास्त रेतीची वाहतूक करणार्या १0 वाहन धारकांवर कारवाई करून ४0 हजाराचा दंड वसूल केल्याची कारवाई तहसिलदार डॉ.निलेश अपार यांच्या मार्गदर्शनाखाली १७ फेब्रुवारी रोजी करण्यात आली.
लोणारला लागून असलेल्या मराठवाड्यातील रेती घाटावरून अवैधरित्या रेतीचा उपसा करून क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती मिळताच तहसिलदार डॉ.निलेश अपार यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी लक्ष्मण चोले, अनिल ढवळे, तलाठी विष्णु केंद्रे, कैलास बोथगिरे, शिवशंकर खारवाल यांनी कारवाई करून १0 वाहनांवर कारवाई केली. यावेळी अस्मिता वाघ, खुशाल वासनकर, मोहम्मद मुनावर, श.अनवर शे.आलम, गणेश ताठे, शे.हारूण शे.गफूर, शे.रहीम शे.कमरूद्दीन, नसिम खान, खाजा शे.अख्तर यांच्या वाहनांवर कारवाई करून ४0 हजाराचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे अवैध रेती वाहतूक करणार्यांमध्ये खळबळ उडाली आहे.