आरोपीला न्यायालयीन कोठडी
By Admin | Updated: October 14, 2015 00:34 IST2015-10-14T00:34:51+5:302015-10-14T00:34:51+5:30
संग्रामपूर येथील देशी कट्टा व काडतूस जप्त प्रकरणातील आरोपी; चार देशी कट्टे व तीन जीवंत काडतूसासह केली होती अटक.

आरोपीला न्यायालयीन कोठडी
संग्रामपूर (जि. बुलडाणा): चार देशी कट्टे व तीन जीवंत काडतूसासह अटक करण्यात आलेल्या संग्रामपूर तालुक्यातील निमखेडी येथील रुपसिंग भरपूरसिंग टाक याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पोलिस कोठडीदरम्यान पोलिस प्रशासनाच्या दृष्टीने अपेक्षीत अशी उपयुक्त माहिती त्याच्याकडून मिळू शकली नसल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले. रुपसिंगला प्रारंभी न्यायालयाने तीन दिवस व नंतर चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. पाच ऑक्टोबर रोजी तामगाव पोलिसांनी रुपसिंग टाक यास चार देशी कट्टे व तीन जीवंत काडतूसासह संग्रापूर तालुक्यातील लाडणापूर शिवारात नागोजीबाबा मजहर दग्र्याजवळ अटक केली होती. जळगाव जामोद न्यायालायने त्याची प्रारंभी तीन दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी केली होती. त्यानंतर पुन्हा चार दिवसांची त्यास पोलिस कोठडी देण्यात आली होती. त्याची मुदत मंगळवारी संपल्याने त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. पाच ऑक्टोबरला देशी कट्टे विक्री प्रकरणात रुपसिंग टाकला दुसर्यास ही शस्त्रे विक्री करण्यापूर्वीच अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून चार देशी कट्टे व तीन जीवंत काडतुसे त्यावेळी पोलिसांनी जप्त केले होते. सहाय्यक पोलिस निरीक्षक कपील शेळके, पोलिस उपनिरीक्षक सुनील बडगुजर व त्यांच्या सहकार्यांनी ही कारवाई केली होती.