एका दिवसात पकडला ‘त्या’ खुनाचा आरोपी
By Admin | Updated: December 4, 2014 00:53 IST2014-12-04T00:53:01+5:302014-12-04T00:53:01+5:30
देऊळगावराजा येथील खूनप्रकरण; आरोपीस पोलिस कोठडी.
_ns.jpg)
एका दिवसात पकडला ‘त्या’ खुनाचा आरोपी
देऊळगावराजा (बुलडाणा): ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये स्वत:च्या मित्राला कायमस्वरुपी नोकरी मिळाल्याचा वचपा काढत अतिशय निर्दयीपणे मित्राचा खून केल्याची घटना ३0 नोव्हेंबर रोजी घडल्यानंतर अवघ्या एका दिवसात देऊळगावराजा पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले आहे.
चिखली तालुक्यातील वैरागड येथील आरोपी अंकुश नवनाथ बांगर हा २५ वर्षीय तरुण पुणे येथील संगम ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये ड्रायव्हर म्हणून कामास होता. पाच ते सहा महिन्याअगोदर त्याच्या गावाशेजारील टाकरखेड हेलगा येथील अमोल मुरलीधर कदम (२५) याला त्याने आपल्या सोबत काम करण्यासाठी या कंपनीमध्ये पुण्याला घेऊन गेला; मात्र आरोपी अंकुश हा कामावर वेळोवेळी गैरहजर राहत असल्याने कंपनीने त्याला कामावरुन कमी करुन त्याचा मित्र अमोल कदम यास कंपनीने कामास ठेवले. याच गोष्टीचा राग अंकुशला आल्याने वचपा काढण्यासाठी देऊळगावराजा बायपासवर खंडोबा टेकडीनजीक निर्जनस्थळी गाडी थांबवून झोपलेल्या अमोलच्या डोक्यामध्ये लोखंडी टामीने प्रहार करुन त्यास खाली ओढून रस्त्यावर टाकून वाहनाचे चाक निर्दयीपणे दोन ते तीन वेळा फिरवून त्यास ठार केले. हा अपघात वाटावा व कुणाला शंका येऊ नये म्हणून अमोलच्या अंगावरचे कपडे काढले. ३0 नोव्हेंबर रोजी हा प्रकार उघडकीस ये ताच ठाणेदार अंबादास हिवाळे यांनी जि.पो.अ.श्यामराव दिघावकर व एस.डी.पी.ओ.प्रशांत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली मृतकाचे फोटो सर्व ठिकाणी पाठविले व आपले शोधपथक रवाना केले. अवघ्या एका दिवसात गुन्ह्याचा तपास लावला. याकामी शे.जाफर, पंजाब साखरे, वाहनचालक मुळे यांनी परिङ्म्रम घेतले. आरोपीला सात दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे.