महिला खून प्रकरणातील आरोपी अटकेत
By Admin | Updated: November 30, 2014 23:22 IST2014-11-30T23:22:05+5:302014-11-30T23:22:05+5:30
डोणगाव पोलिसांची कारवाई.
_ns.jpg)
महिला खून प्रकरणातील आरोपी अटकेत
डोणगाव (बुलडाणा) : स्थानिक शासकीय धान्य गोदामाच्या पाठीमागे धारदार शस्त्राने सलीमाबी गफ्फार शहा वय ४५ हिच्यावर वार करुन प्रेत टाकून दिले होते. यावर डोणगाव पोलिसांनी महिलेची मुलगी परवीनबीच्या तक्रारीवरुन आरोपी शे.रियाज शे.मोहम्मद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. परंतु आरोपी घटनेनंतर फरार होता. त्यावर ठाणेदार घुगे, पोहेकॉ शरद बाठे यांनी आरोपीच्या शोधात सिंदखेडराजा गाठून आरोपीची पत्नी, सासरे यांना आरोपीला पोस्टेला हजर करण्याचे सांगितले. त्यावर ३0 नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता आरोपीने पोलिस स्टेशनला हजर झाला. पोलिसांनी त्याला अटक केली व पुढील तपास ठाणेदार घुगे करीत आहेत. जिल्ह्यात खून व गुन्हेगारीच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे पोलिसांचा वचक नाहीसा झाल्याची चर्चा होत आहे.