लैंगीक शोषण प्रकरणी आरोपीस पोलिस कोठडी
By Admin | Updated: January 20, 2015 23:24 IST2015-01-20T23:24:31+5:302015-01-20T23:24:31+5:30
बुलडाणा येथे वर्षभरापासून सुरु होता प्रकार.

लैंगीक शोषण प्रकरणी आरोपीस पोलिस कोठडी
बुलडाणा : अल्पवयीन मुलीच्या लैंगीक शोषण प्रकरणी शिक्षक कॉलनी धामणदरी परिसरातील एका आरोपीस न्यायालाने २0 जानेवारी पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
बुलडाणा शहर पोलिस स्टेशनअंतर्गंत येणार्या शिक्षक कॉलनी धामणदरी परिसरातील आरोपी प्रशांत ठेंग (वय २५) याने वर्षभरापासून एका अल्पवयीन मुलीचे लैंगीक शोषण केले. तसेच तिचे आक्षेपार्ह फोटोही काढले. याप्रकरणी कोणाला काही सांगितल्यास आरोपीने या मुलीस मारहाण केली. तसेच तिच्या पालकांना जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत सदर मुलीच्या तक्रारीवरून आरोपीविरूध्द १८ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान पोलिसांनी आरोपी प्रशांत ठेंग यास अटक केली. सदर आरोपीस आज न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने आरोपीस दोन दिवसाची पोलिस कोठडी ठोठावली आहे. याप्रकरणी अधिक तपास ठाणेदार तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.