शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

बालिकेवर बलात्कारप्रकरणी आरोपीस १० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 18:39 IST

आरोपी विजय राजु गायकवाड याने बोराखेडी,  ता.मोताळा येथील अज्ञान बालिकेला लग्नाचे आमीष देवून पळवून नेले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर :  बोराखेडी येथील बालिकेवर तिला पळवून नेवून बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी विजय राजु गायकवाड यास १० वर्षे सक्त मजुरी व दंड ठोठावण्यात आला आहे. मलकापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश आर.एम. जाधव यांनी २३ सप्टेंबररोजी हा निकाल दिला. आरोपी विजय राजु गायकवाड याने बोराखेडी,  ता.मोताळा येथील अज्ञान बालिकेला लग्नाचे आमीष देवून पळवून नेले होते. याबाबत पिडीतेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून, आरोपी विरूध्द भादंविच कलम ३६३, ३६६, ३७६ तसेच बाल लैंगीक अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे कलमानुसार गुन्हा क्र.२०/१५ हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे तपासानंतर वि.न्यायालयामध्ये त्यावरून विशेष सत्र खटला क्र.१४/१५ हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता विवेक मा.बापट यांनी ११ साक्षीदार तपासले. या कामी न्यायालयीन पैरवी म्हणून राजेश भंडारी, एएसआय पोलीस स्टेशन बोराखेडी यांनी सहाय्य केले.या प्रकरणात अंतिम युक्तीवाद पूर्ण होवून आज रोजी न्यायनिर्णय जाहीर करण्यात आला. त्यानुसार आरोपी विजय राजु गायकवाड यास भादंविचे कलम ३६३ नुसार ५ वर्षे सक्तमजुरी व दंड रक्कम रू.२ हजार, दंड न भरल्यास एक महिना साधी कैद तसेच कलम ३६६ नुसार ७ वर्षे सक्त मजुरी व दंड रक्कम रू. २ हजार, दंड न भरल्यास एक महिना साधी कैद तसेच भादंविचे कलम ३७६ नुसार १० वर्षे सक्त मजुरी व दंड रक्कम रू.२ हजार, दंड न भरल्यास एक महिन्याची साधी कैद तसेच पोस्को कायद्याचे कलम ४ नुसार १० वर्षे सक्तमजुरी व दंड रक्कम रू.२ हजार, दंड न भरल्यास एक महिना साधी कैद व दंडाची रक्कम पिडीत बालिकेला नुकसान भरपाई दाखल देण्यात यावी असा आदेश वि. जिल्हा व सत्र न्यायाधिश आर.एम. जाधव यांनी दिला. या प्रकरणात सहाय्यक सरकारी अभियोक्ता  म्हणून विवेक बापट यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)

टॅग्स :MalkapurमलकापूरCourtन्यायालयRapeबलात्कारCrime Newsगुन्हेगारी