फरार झालेल्या आरोपीस शेगाव बसस्थानकावरून अटक
By Admin | Updated: July 27, 2016 00:04 IST2016-07-27T00:04:03+5:302016-07-27T00:04:03+5:30
संग्रामपूर न्यायालय परिसरातून आरोपी झाला होता पसार.

फरार झालेल्या आरोपीस शेगाव बसस्थानकावरून अटक
संग्रामपूर (जि. बुलडाणा): येथील न्यायालय परिसरातून पोलिसांच्या अटकेतून फरार झालेल्या आरोपीला तामगाव पोलिसांनी शेगाव येथील रेल्वे स्थानकावरून २५ जुलैच्या रात्री ३ वाजेदरम्यान अटक केली.
देऊळगावराजा तालुक्यातील मेहुणा राजा येथील कैलास साहेबराव जाधव यांच्यावर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. २५ जुलै रोजी त्याचा पकड वॉरंट निघाल्याने त्याला दिवाणी व फौजदारी न्यायालयात आणले असता, कैलास जाधव हा पोलिसांच्या हातातून पळून गेला होता. तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार बी.आर. गीते यांनी तपासाची चक्रे गतिमान करत सदर आरोपीला शेगाव येथील रेल्वे स्थानकावरून अवघ्या आठ तासामध्ये रात्री ३ वाजेदरम्यान अटक करण्यात आली.