अल्पवयीन मुलीला पळवून नेणा-या आरोपीस अटक
By Admin | Updated: March 19, 2017 02:20 IST2017-03-19T02:20:09+5:302017-03-19T02:20:09+5:30
रावेर येथून घेतले ताब्यात

अल्पवयीन मुलीला पळवून नेणा-या आरोपीस अटक
संग्रामपूर (बुलडाणा), दि. १८- गत नऊ महिण्यापूर्वी अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन तिच्यावर लैगींक अत्याचार करणार्या आरोपी शंकर रमेश बरेला यास रावेर येथून शुक्रवारी सोनाळा पोलिसांनी अटक केली.
संग्रामपूर तालुक्यातील पिंगळी येथील साडे बारा वर्षीय अल्पवयीन मुलीला आरोपी सुरेश भावसिंग डाबर व अन्य एका आरोपीने पळवून नेल्याची तक्रार सुशिला रामचंद्र बावस्कर या महिलेने ३ जून २0१६ रोजी सोनाळा पोलिस स्टेशनला दिली होती. पोलीस तपासात यातील आरोपी सुरेश भावसिंग डाबर (१९ ) यास १२ ऑगस्ट २0१६ रोजी मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील कटझांरा येथून पकडण्यात आले. या आरोपीच्या चौकशीतून मुख्य आरोपी हा मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील कांकरीया येथील शंकर रमेश बारेला (१९) असल्याचे स्पष्ट झाले. शंकर बारेला व अल्पवयीन पीडिता जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे राहत असल्याचे स्पष्ट झाले. या माहितीचा मागोवा घेत एक पथक तपासासाठी रावेर येथे पाठविण्यात आले; मात्र आरोपी तेथूनही पसार झाला. दरम्यान तो पुन्हा रावेर येथे आला असल्याची माहिती मिळताच रावेर पोलिसांनी आरोपीस अटक करून सोनाळा पोलिसांच्या ताब्यात दिले.
सोनाळा पोलिसांनी आरोपी रमेश बारेला (१९ ) व पीडितेला ताब्यात घेतले. पीडितेची विचारणा केली असता आरोपीने तीच्यावर सतत लैगींक अत्याचार केले असल्याचे समोर आले. त्यावरुन पोलिसांनी या प्रकरणात शनिवारी कलम ३७६ भादंवि सह कलम ३,४ बालकांचे लैगींक गुन्ह्यापासून संरक्षण अधि.२0१२ समाविष्ट करण्यात आले.