शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला!
2
पडळकर-आव्हाड समर्थक राडा प्रकरणी अहवाल सादर; "'त्या' कार्यकर्त्यांना २ दिवस कारावास अन्..."
3
तंबाखू आणि सिगारेट महागणार! केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात ५ पट वाढ; नवीन किंमत काय असेल?
4
विधानसभेत मंत्री नितेश राणेंची कोपरखळी; "काल चिडलेले होते, वैयक्तिक भेटले तर मिठीही मारतात..."
5
पहिला अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानच्या मुलीची पंतप्रधानांना साद; 'माझ्यावर वारंवार बलात्कार, मदत करा, न्याय द्या'
6
रिस्क है तो...! कार डीलरचा मुलगा ते शेअर बाजाराचा 'बिग बुल'; हर्षद मेहताचा 'वाद'ळी प्रवास
7
“श्रमलेल्या बापासाठी लेक...”; शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची खास पोस्ट
8
रुपयाचा ऐतिहासिक नीचांक! डॉलरच्या तुलनेत दर ९०.५६ रुपये; घसरण्याची ३ मोठी कारणे समोर
9
एकाच रिचार्जमध्ये मिळणार वाय-फाय, फोन आणि डीटीएच, हा प्लान खूप खास
10
Video - "तुला लाज वाटली नाही?"; नवऱ्याने बायकोला बॉयफ्रेंडसोबत OYO मध्ये रंगेहाथ पकडलं अन्...
11
मुलानं आईला मारलं, मग स्वतःलाही संपवलं; ChatGPT कारणीभूत? OpenAI वर खटला!
12
Kankavli: हरवलेल्या मोबाईलमुळे ‘त्या’ प्रेमी युगुलानं संपवलं जीवन, तपासातून धक्कादायक माहिती समोर   
13
आश्चर्यकारक! Tata च्या नवीन Sierra ने दिले 30 kmpl चे मायलेज; 222 kmph चा टॉप स्पीडही गाठला
14
हिरा निघाला 'हा' शेअर; ९० टक्के फायद्यावर लिस्टिंग, IPO मध्ये लागलेली फक्त २ पट बोली
15
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, सोनं 1.34 लाख पार तर चांदी 2 लाखांच्या उंबरठ्यावर; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
16
मॅक्सिको भारतावर नाही तर आपल्याच प्रगतीवर टाळं लावतोय, फेडावी लागेल मोठी किंमत
17
कोथरुडमध्ये मिळू लागले अवघ्या ८६ रुपयांना लीटर पेट्रोल; वाहनचालकांची उडाली झुंबड...
18
China Condom Tax: चीनमध्ये कंडोमवर भरपूर टॅक्स लादणार, जिनपिंग यांच्या धोरणाला विरोध का होतोय?
19
प. बंगालमध्ये आता बांधले जाणार राम मंदिर; भाजपा नेत्यांनी लावले पोस्टर, देणगी देण्याचे आवाहन
20
विनेश फोगाटचा यू-टर्न! पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात परतणार, निवृत्तीचा निर्णय रद्द, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

१७ हरणांच्या मृत्यूप्रकरणी आरोपीस अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 18:49 IST

Khamgaon News : मुख्य आरोपी राधुसिंग छत्तरसिंग डावर, रा. हनवतखेड याच्या वनविभागाने मुसक्या आवळल्या.

ठळक मुद्दे१४ मे रोजी सकाळी आठ वाजताच्या दरम्यान दहा हरणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. आणखीही सात हरणांचा मृत्यू अशाच प्रकारे झाल्याने ती संख्या १७ वर पोहोचली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव जामोद (बुलडाणा) : तरोडा बु. गावाच्या शेत शिवारात दहा काळविटांचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुख्य आरोपी राधुसिंग छत्तरसिंग डावर, रा. हनवतखेड याच्या वनविभागाने मुसक्या आवळल्या. त्याला प्रथमश्रेणी न्यायालयासमोर हजर केले असता २४ मेपर्यंत वन कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.तालुक्यातील ग्राम तरोडा बु. शिवारामध्ये १४ मे रोजी सकाळी आठ वाजताच्या दरम्यान दहा हरणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सोबतच आणखीही सात हरणांचा मृत्यू अशाच प्रकारे झाल्याने ती संख्या १७ वर पोहोचली होती. वन विभागाच्या पथकाने पंचनामा करून हरणांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावली. शिवारात सहा मादी व चार नर प्रजातीच्या मृतदेहांचा दस्तऐवज तयार करून वनगुन्हा नोंदविण्यात आला. यावेळी हरणांचे संपूर्ण अवयव आढळून आले. तसेच पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून शवविच्छेदन करून त्यांच्या शरीराचे आवश्यक भाग गोळा करण्यात आले. नमुने सीलबंद करून न्याय वैद्यक प्रयोगशाळेत पुढील तपासाकरिता पाठविण्यात आले. त्या दिवशीपासून आरोपीचा शोध सुरू होता.

तसेच जळगाव जामोदचे वनपरिक्षेत्र अधिकारी बी. डी. कटारिया व त्यांचे वनकर्मचारी तपास करीत होते. या प्रकरणातील मुख्य आरोपीचा छडा पाच दिवसांत लावण्यात आला. संपूर्ण प्रकरणाचा तपास उपवनसंरक्षक (प्रा) बुलडाणा अक्षय गजभिये, सहायक वनसंरक्षक आर. आर. गायकवाड यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

टॅग्स :khamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारीJalgaon Jamodजळगाव जामोद