फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2016 00:36 IST2016-03-19T00:36:13+5:302016-03-19T00:36:13+5:30
बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली फरार आरोपीस अटक.

फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात
बुलडाणा : राज्यातील बर्याच शहरांत घडलेल्या चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांना हवा असलेल्या चोरट्याला बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १७ मार्च रोजी अटक केली. चोरट्यावर बर्याच पोलीस स्टेशनमध्ये चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
नाशिक जिल्ह्यातील राजपूर येथील आरोपी दीपक भारत भालके हा काही दिवसांपासून बुलडाणा शहरात मुक्कामी असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनात पीएसआय सय्यद मोहसिन, एएसआय अंभोरे, अताउल्लाह खान, नंदकिशोर धांडे, विलास काकड, रामु मुंडे आणि नदीम शेख यांनी सापळा रचून १७ मार्च रोजी रात्री आरोपी दीपक भालके याला चिखली मार्गावरील गोलांडे लॉनजवळ पकडले. यानंतर त्याच्या रुमची तपासणी केली असता, पोलिसांनी तीन मोटारसायकल, स्पीकर बॉक्स, एम्पलीफायर, माईक असा चोरीचा जप्त केला. आरोपी दीपक भालके याच्यावर नाशिक, अहमदनगर, जळगाव येथील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत.