दीड वर्षांपासून फरार आरोपी अटकेत

By Admin | Updated: January 28, 2016 23:33 IST2016-01-28T23:26:35+5:302016-01-28T23:33:39+5:30

वैरागड येथील मारहाण प्रकरणात फरार असलेले दोन आरोपीं अटकेत.

The accused absconded for a year and a half | दीड वर्षांपासून फरार आरोपी अटकेत

दीड वर्षांपासून फरार आरोपी अटकेत

अमडापूर (जि. बुलडाणा): येथून जवळच असलेल्या वैरागड येथील मारहाण प्रकरणात फरार असलेल्या दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने २८ जानेवारी रोजी अटक केली. २९ जून २0१४ पासून हे आरोपी फरार होते. वैरागड येथील बाळू शालीग्राम पवार (वय २५ वर्षे) याने २९ जून २0१४ रोजी आरोपी रघुनाथ भोसले, बाली रघुनाथ भोसले रा.वैरागड यांनी मारहाण करून जखमी केले होते. यानंतर अमडापूर पो.स्टे.ला तक्रार दिल्यावरून आरोपीविरुद्ध कलम ३२४, ५0४, ५0६, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून आरोपी रघुनाथ भोसले, बाली रघुनाथ भोसले हे फरार झाले होते. या आरोपींना २८ जानेवारी रोजी सकाळी १0 वाजता बुलडाणा गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. या कारवाईत एपीआय नीलेश लोधी, ए.एस.आय. प्रकाश राठोड, पोहेकाँ राजू ठाकूर, केशव नागरे, दीपक पवार, श्रीकांत चिंचोले व महिला पोलीस सविता वाकोडे सहभागी झाले.

Web Title: The accused absconded for a year and a half