पीक विम्याचे १४0 कोटी शेतक-यांच्या खात्यात

By Admin | Updated: July 21, 2016 00:59 IST2016-07-21T00:59:25+5:302016-07-21T00:59:25+5:30

पीक विमा नुकसानभरपाईपोटी बुलडाणा जिल्ह्याला १८४.३२ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला.

In the account of 140 crore farmers of crop insurance | पीक विम्याचे १४0 कोटी शेतक-यांच्या खात्यात

पीक विम्याचे १४0 कोटी शेतक-यांच्या खात्यात

बुलडाणा : खरीप हंगाम २0१५ मधील पीक विमा नुकसानभरपाईपोटी पीक विमा कंपनीमार्फत मे २0१५ मध्ये विम्याची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्याला २६ मे ते ६ जून २0१६ या कालावधीदरम्यान मंजूर असलेला १८४.३२ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. सदर निधी शेतकर्‍यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी बँकांकडे वर्ग करण्यात आला आहे.
ही रक्कम बँकांनी १५ दिवसांत शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करणे आवश्यक होते; परंतु १६ जुलै २0१६ रोजी बँक अधिकार्‍यांची कृषी विभागाने आढावा बैठक घेतली असता, १४0 कोटी रुपये शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा केल्याचा अहवाल बँकांनी यावेळी दिला. सदर बैठकीमध्ये २२ जुलै २0१६ पयर्ंत जिल्ह्यासाठी प्राप्त झालेली सर्व रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी कळविले आहे.

Web Title: In the account of 140 crore farmers of crop insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.