दोन वर्षात आठ बिबटांचा अपघाती मत्यू

By Admin | Updated: August 3, 2015 01:27 IST2015-08-03T01:27:22+5:302015-08-03T01:27:22+5:30

बुलडाणा जिल्हय़ातील ज्ञानगंगा अभयारण्य व परिसरातील वन्यजीव संपदा संकटात.

The accidental death of eight leopards in two years | दोन वर्षात आठ बिबटांचा अपघाती मत्यू

दोन वर्षात आठ बिबटांचा अपघाती मत्यू

बुलडाणा : जिल्हय़ातील ज्ञानगंगा अभयारण्य व परिसरातील वन्यजीव संपदा संकटात सापडली आहे. मागील काही वर्षात या वन्यजीवांचे अपघाती मत्यू प्रमाण झपाट्याने वाढत आहे. संबंधित विभाग या प्राण्यांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना करतो आहे, असा प्रश्न वन्यजीव प्रेमींनी उपस् िथत केला आहे. शासनाच्यावतीने जंगलातील वन्यजीवांचे संरक्षण व्हावे या हेतूने कठोर कायदे तयार करण्यात आले आहेत. कोट्यवधीचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तरीही जिल्हय़ातील वन्यजीव संदर्भात वन विभाग गांभीर्याने घेत नाही. जिल्हय़ातील बुलडाणा-बोथा, खामगाव या मार्गावर हे अभयारण्य पसरलेले आहे. या परिसरात जानेवारी २0१४ मध्ये एक गर्भवती बिबट तर फेब्रुवारी २0१५ मध्ये एका बिबटचा अपघाती मृत्यू झाला होता. आता १ ऑगस्ट रोजीदेखील तालुक्यातील हनवतखेड परिसरात बिबटचा मृतदेह सापडला आहे. पूर्वीच्या दोन्ही बिबट या गर्भवती असून, त्यांच्या गर्भात एकूण पाच बछडे असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे त्यांच्या सोबतच त्या बछड्यांचादेखील जन्माच्या पूर्वीच मत्यू झाला. हणवतखेड येथे सापडलेल्या बिबटच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आले नाही. यासाठी त्या बिबटचा व्हिसेरा प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. सदर बिबटदेखील गर्भवतीच होती; मात्र वनविभागाकडून याची माहिती मिळू शकली नाही. जिल्हय़ातील वन्यप्राण्यांची जवाबदारी वनविभाग व वन्यजीव विभाग यांच्यावर टाकण्यात आली आहे. यापूर्वी ज्ञानगंगा अभयारण्य मार्गावर होणार्‍या या दुर्घटनेला पाहता जुलै २0१५ रोजी प्रशासनाच्याव तीने रात्रीच्यावेळी या मार्गावर होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामुळे या मार्गावर काही प्रमाणात होणार्‍या अपघाताला आळा बसेल; मात्र इतर ठिकाणी होणार्‍या अपघाताचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

* डीएफओ 'आऊट ऑफ कव्हरेज'

या संदर्भात अधिक माहिती साठी जिल्हयाचे डीएफ ओ सी. एम धारणकर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन आफट ऑफ कव्हरेज दाखवित असल्याने अधिक माहि ती मिळू शकली नाही.

* या प्राण्यांचा झाला अपघाती मत्यू

    जिल्हयात मागील दोन वर्षात तीन बिबट, त्यांच्या गर्भातील पाच बछडे, या सह दोन कोल्हे, एक अस्वल आदींचा मत्यू वाहन अपघाताने झाले असल्याची माहिती समोरअ ाली आहे. या संदर्भात अमरावती येथील तत्कालीन मुख्य वनसंरक्षक डॉ दिनेश त्यागी यांनी तत्काह ज्ञानगंगा अभयारण्यास भेट देवून पाहणी देखील केली होती.

Web Title: The accidental death of eight leopards in two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.