अंढेरा : सोलापूर-मलकापूर महामार्गावर देऊळगाव राजा तालुक्यातील अंचरवाडी फाट्यानजीक बस व दुचाकीची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात दुपारी दोन वाजता झाला. सोलापूरवरून मलकापूरला जाणारी बस (एमएच-४०-एक्यू-६२४९) आणि दुचाकीची (क्र. एमएच-२८-एव्ही-६९४६) समोरासमोर धडक झाली. त्यामध्ये बुलडाणा येथून दुचाकीवर देऊळगाव राजाकडे जात असलेले श्रीकांत श्रीराम चव्हाण (३०, रा. बुलडाणा) यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल संदीप पाटील हे करीत आहेत.
सोलापूर-मलकापूर महामार्गावर बस-दुचाकी अपघात; एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 18:36 IST