शेगाव-वरवट मार्गावर अपघात; एक ठार

By Admin | Updated: May 7, 2017 02:24 IST2017-05-07T02:24:15+5:302017-05-07T02:24:15+5:30

ट्रॅक्टर आणि मोटारसायकलमध्ये झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला.

Accident on Shegaon-Worutt Marg; One killed | शेगाव-वरवट मार्गावर अपघात; एक ठार

शेगाव-वरवट मार्गावर अपघात; एक ठार

शेगाव : शेगाव-वरवट मार्गावर ट्रॅक्टर आणि मोटारसायकलमध्ये झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी रात्री ९.३0 वाजता दरम्यान घडली.
शेगाववरून काझीखेड शिवारात असलेल्या मेंढरांच्या पाळ्याकडे जाण्यासाठी एम एच २८ क्यू १५९ या मोटारसायकलने संजय चांगो हाके आणि पांडुरंग बिचकुले दोन्ही रा. पिंपळगाव नाथ ता. मोताळा हे निघाले होते. दरम्यान, त्यांना शेगाव-वरवट मार्गावर समोरून येणार्‍या टॅक्टरने जबर धडक दिली.
यात संजय चांगो हाके यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर पांडुरंग बिचकुले हे गंभीर जखमी झाले. उपरोक्त दोघांना शेगाव येथील सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, प्रकृती अत्यवस्थ असल्याने बिचकुले यांना अकोला येथे हलविण्यात आले आहे.

Web Title: Accident on Shegaon-Worutt Marg; One killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.