मलकापूर पांग्रा येथे अपघात; दोन ठार
By Admin | Updated: April 24, 2017 02:12 IST2017-04-24T02:12:53+5:302017-04-24T02:12:53+5:30
मलकापूर पांग्रा (जि. बुलडाणा)- येथील नेहरु विद्यालयाजवळ झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले. ही घटना रविवारी रात्री उशिरा ११.३० च्या सुमारास घडली.

मलकापूर पांग्रा येथे अपघात; दोन ठार
प्रताप देशमुख - मलकापूर पांग्रा (जि. बुलडाणा)
येथील नेहरु विद्यालयाजवळ झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले. ही घटना रविवारी रात्री उशिरा ११.३० च्या सुमारास घडली. मोटारसायकल क्र. एमएच-३७ एन-७००३ ने अमोल संतोष देवकर (३२) रा. शेंदुरजन व नामदेव रामभाऊ सानप (५५) रा. दुसरबीड हे साखरखेर्डावरुन दुसरबीडला जात होते. नेहरु विद्यालयाजवळ असलेल्या पुलावर अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली. या धडकेत दोघेही जागीच ठार झाले. पीएसआय अयुब खान,पो. काँ. पवार, चौगुले तपास करीत आहेत.