शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

घाटपूरी बायपासवर अपघात; वाहतूक पोलीसांचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 12:59 IST

खामगाव : शहराबाहेरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक व्यवस्था वाऱ्यावर असल्याचे दिसून येते.

 राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक व्यवस्था वाºयावर!            खामगाव : शहराबाहेरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक व्यवस्था वाऱ्यावर असल्याचे दिसून येते. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता घाटपूरी मार्गावर मिनीडोअर व ट्रकचा अपघात घडल्यानंतर ही वस्तुस्थिती समोर आली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नसले घटनास्थळी बघ्यांनी केलेल्या गर्दीमुळे वाद निर्माण झाला होता. दरम्यान ही घटना घडल्यानंतर तासभर तरी या परिसरात वाहतूक पोलीस दिसून आले नाही.घाटपुरी कडून खामगावकडे मिनिडोअर क्रमांक एम.एच.२८-१७८२ ने शेतमाल विक्रीसाठी नेण्यात येत होता. दरम्यान घाटपुरी ते खामगाव दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर गौरक्षण परिसरात या मिनीडोअरला ट्रक क्रमांक आर.जे.३१ जी.ए.०१११ ने मागून धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र मिनीडोअरचे नुकसान झाले. घटना घडल्यानंतर परिसरातील नागरीकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. यावेळी ट्रकचालकाकडून मिनिडोअरचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी वाद निर्माण झाला होता. अशी परिस्थीती असताना, घटना घडल्यानंतर तब्बल तासभर या ठिकाणी वाहतूक पोलीस दिसून आले नाही. विशेष म्हणजे अपघात स्थळापासून अगदी हाकेच्या अंतरावर वाहतूक पोलीसांचा पॉर्इंट असल्यावरसुध्दा एकही पोलीस घटनास्थळावर दिसून आल्याने राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक व्यवस्था वाºयावर असल्याचे दिसून आहे.

प्रवाशी वाहनांमधून शेतमालाची वाहतूक!ग्रामीण भागातून अनेक प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून शेतमालाची वाहतूक करण्यात येते. वास्तविक पाहता, अशा वाहनांमधून माल वाहतूक करण्यास प्रतिबंध असताना, दररोज शेकडो वाहनांमधून अशी मालवाहतूक होताना दिसते. याकडे वाहतूक पोलीसांचे दुर्लक्ष होते. परिणामी क्षमतेपेक्षा जास्त भरलेल्या वाहनचांलकांचेही नियंत्रण सुटून अपघाताच्या घटना घडतात. याकडे आरटीओकडून सुध्दा कानाडोळा करण्यात येत असल्याचे दिसून येते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावAccidentअपघात