शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

देऊळगाव राजा-चिखली रस्त्यावर भाविकांच्या वाहनाला  खाजगी बसची धडक; ४६ जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 18:37 IST

देऊळगाव मही (बुलडाणा) : रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या भक्तांच्या मॅटेडोअरला खाजगी बसने मागून धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात मॅटेडोअरमधील ३५ प्रवासी जखमी झाल्याची घटना २५ जुलै रोजी सकाळी ४.४५ वाजता घडली.

ठळक मुद्देजखमींना उपचारार्थ बुलडाणा, जालना येथे हलविण्यात आले असून, घटनास्थळावरून खाजगी बस चालक फरार झाला आहे.एमएच ३० एचडी २२०० या क्रमांकाच्या खाजगी बसने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या मॅटेडोअरला जोरदार धडक दिली.या अपघाता मॅटेडोअरमधील जवळपास ३५ प्रवासी जखमी झाले असून मॅटेडोअरचा चुरा झालेला आहे.

देऊळगाव मही (जि. बुलडाणा) : पंढरपूर येथून परतणाºया जळगाव खान्देश जिल्ह्यातील तथा मध्य प्रदेशातील भाविकांच्या टेम्पोला बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव महीनजीक पहाटे खासगी प्रवासी वाहतूक करणाºया बसने जबर धडक दिल्याने ४६ प्रवासी जखमी झाले. हा अपघात २५ जुलै रोजी पहाटे ४.४५ वाजताच्या सुमारास घडला. जखमींपैकी २६ जणांना बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात तर गंभीर सहा जणांना जालना येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान, अपघातास कारणीभूत ठरलेल्या बस चालकास देऊळगावराजा पोलिसांनी अटक केली आहे.यामध्ये टेम्पो चालक पांडुरंग शांताराम पाटील, (रा. खामखेड, जि. जळगाव) याच्यासह अन्य पाच जणांचा समावेश आहे. दरम्यान, बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात नीती प्रभाकर पाटील (रा. खामखेड), वसंत हिराजी पाटील (पाथर्डी, बºहाणपूर, मध्य प्रदेश), मोहन राजाराम पाटील (खकणार, बºहाणपूर), अमरदीप आनंदा पाटील (मुक्ताईनगर), गोविंदा नारायण महाजन (नायनखेडा, बºहाणपूर), माधुरी महाजन (खकणार), लता महाजन (नायनखेडा), अंजना पाटील (रुईखेड), प्रमिला धनगर (वरणगाव), सुनंदा बोरसे (पातोंडी, रावेर), भारती पाटील (बेलसावडी, मुक्ताईनगर), बेबीबाई बोरसे (चिखली, ता. मलकापूर), शांताबाई पाटील (मुक्ताईनगर), बेबीबाई पाटील (पिंप्री), सुनीता महाजन (शहापूर, बºहाणपूर), सुमित्रा पाटील (भोकरी), सुनीता चौधरी (शहापूर), जिजाबाई ठाकूर (शहापूर), कोकिळा चौधरी (खकणार), सुशीला पाटील (खकणार), दगडाबाई पाटील (खकणार), विमल बाबुराव माळी (खकणार), यशोदा पाटील, शेवंताबाई पाटील (चिंचखेड), लाडकीबाई सावलकर (सावरगाव), ज्योती जाधव (खकणार) यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. अन्य जखमींमध्ये पंडित भोरसे, सुनंदा पंडित, शोभा बावीस्कर, वच्छला पंडित, शिवाजी ताठे, रंजना पाटील, आरती अनिल पाटील, वैशाली कोडे, आशा भांबरे, भारती पाटील, गोविंदा सकाळे, पिराबाई, नीलेश, सुभाष सुधीर, रुख्माबाई, कामिनी काडेळकर यांचा समावेश आहे. यापैकी काहींवर प्रथमोपचार करून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.पंढरपूरवरून टेम्पोद्वारे परतणारे जळगाव खान्देश व मध्य प्रदेशमधील भाविक हे देऊळगाव महीनजीक बुधवारी पहाटे ४.४५च्या सुमारास स्वामी विवेकानंद विद्यालयानजीक रस्त्याच्याकडेला टेम्पोमध्येच थांबले होते. त्यात ५० ते ५२ प्रवासी होते. दरम्यान, देऊळगावराजाकडून चिखलीकडे जात असलेल्या भरधाव वेगातील खासगी प्रवासी वाहतूक करणाºया बसने (एमएच ४०-एचडी-२२००) बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या या टेम्पोला जबर धडक दिली. त्यामध्ये हा टेम्पो अक्षरश: तुटून रस्त्याच्या बाजूला उलटला, त्यामुळे त्यात बसलेले प्रवासी दबल्या गेले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघातDeulgaon Rajaदेऊळगाव राजा