शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

लोणार सरोवरातील वेडी बाभूळ निर्मूलनाच्या हालचालींना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 12:26 PM

Lonar Crater लोणार सरोवर विकास आराखड्यांतर्गत ३.६३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जागतिक आश्चर्य असलेल्या लोणार सरोवरातील जैवविविधतेला सरोवरात अवाजवी स्तरावर वाढलेल्या वेड्या बाभळीचा मोठा धोका असून, त्या पार्श्वभूमीवर या वेड्या बाभळीच्या निर्मूलनासाठी व्यापक स्तरावर प्रयत्न होण्याची गरज ओळखून, लोणार सरोवर विकास आराखड्यांतर्गत ३.६३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या लोणार दौऱ्यानंतर या कामास वेग मिळाला आहे. लोणार सरोवर परिसरता पक्षांच्या १६० प्रजाती, ४६ सरपटणारे प्राणी आणि १२ अन्य प्राण्यांच्या प्रजाती राहतात. त्यामुळे येथे जैवविविधतेची मोठी भरमार आहे. मात्र, त्यास अस्ताव्यस्तपणे वाढलेल्या वेड्या बाभळीचा फटका बसत आहे. त्यामुळे तिच्या निर्मूलनासाठी व्यापक स्तरावर माेहीम हाती घेण्याची गरज आहे. मात्र, ते करताना सरोवराच्या जैवविविधतेस धोका निर्माण होणार नाही, याची काळजीही घ्यावी लागणार आहे.नागपूर खंडपीठात लोणार सरोवर क्षती प्रतिबंध व संवर्धनाच्या दृष्टीने दाखल याचिकेमध्येही हा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने २२ फेब्रुवारी रोजी नागपूर खंडपीठाच्या दोन न्यायमूर्तींनी प्रत्यक्ष लोणार येथे भेट देऊन सरोवर संवर्धनाच्या दृष्टीने काय उपाययोजना करण्यात आल्या, याची प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यावेळी वेड्या बाभळीचाही मुद्दा उपस्थित झाला होता. तेव्हा ६० हेक्टरपैकी ६.६८ हेक्टरवरील वेडी बाभूळ काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते, तेव्हा वेडी बाभूळ काढण्यासाठी हॅन्डपिकिंग मशिनचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सातपुडा फाउंडेशनच्या सहकार्याने वेडी बाभूळ निर्मूलनाचे काम त्यावेळी झाले होते.दरम्यान, त्यानंतरही ५४ हेक्टरवरील वेडी बाभूळ काढण्याचे आव्हान वन्यजीव विभागासमोर उभे ठाकलेले आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या लोणार दौऱ्यानंतर लोणार विकास आराखड्यास चालना मिळाली आहे. येथील विकास कामासाठी आगामी वर्षभरात १०७ कोटी रुपये उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यात वेड्या बाभळीच्या निर्मूलनासाठी ३.६३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या संदर्भात लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात येऊन वेडी बाभूळ काढण्यास प्रारंभ करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

टॅग्स :lonar sarovarलोणार सरोवरLonarलोणारlonar bird sanctuaryलोणार पक्षी अभयारण्यbuldhanaबुलडाणा