शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

‘शैक्षणिक प्रगती साधून कुप्रथांचा त्याग करावा -  जयकुमार रावळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 2:12 PM

हुंड्यासारखी कुप्रथाही समाजाने मोडीत काढायला हवी, असे  आवाहन पर्यटन व रोजगार हमी योजना मंत्री ना. जयकुमार रावळ यांनी येथे केले. 

ठळक मुद्देबुलडाणा येथे राजपूत समाज मेळाव्यात आवाहन

राजपूत समाज मेळा बुलडाणा : राजपूत समाजाचा गौरवशाली इतिहास राहिलेला आहे. वर्तमानात या समाजापुढे आर्थिक मागासलेपण दूर करण्यासोबतच इतर अनेक समस्या आहेत. मात्र विपरीत परिस्थीतीतही शैक्षणिक शिखरे गाठत असलेल्या या समाजाने वाईट चालीरीती त्यागण्याची गरज निर्माण झाली असून हुंड्यासारखी कुप्रथाही समाजाने मोडीत काढायला हवी, असे  आवाहन पर्यटन व रोजगार हमी योजना मंत्री ना. जयकुमार रावळ यांनी येथे केले. बुलडाणा जिल्हा राजपूत सेवा समिती व राजपूत भामटा कास्ट्रॉईब असोसिएशन बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने येथील राणा गेस्ट हाऊसमध्ये दोन नोव्हेंबरला सकाळी १० वाजे दरम्यान ना. रावळ यांच्या छोटेखानी सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रक्ताच्या नातेवाईकांना जात वैधता प्रमाणपत्रासाठी अडवू नये, असा निर्णय नुकताच मंत्रीमंडळाने घेण्यामध्ये पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर आणि ना. जयकुमार रावळ यांची भूमिका महत्वपूर्ण ठरली होती. याबद्दल कृतज्ञता म्हणून बुलडाणा दोर्यावर आलेल्या ना. रावळ यांचा जाहीर सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ना. रावळ पुढे म्हणाले की, देशाची सार्वभौमता अबाधित राखण्यासाठी केवळ राजपूत वीरांनीच नव्हे तर राजपूत स्त्रीयांनीही बलिदान केलेले आहे. मात्र हा समाज आज आर्थिकदृष्ट्या खचलेला आहे. त्याला नवी उभारी देण्यासाठी शासन या समाजाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील. जात वैधता प्रमाणपत्रामधील अडचणी दूर करण्यासाठी भाजपा सरकारने रक्ताच्या नातेवाईकाबाबत घेतलेला निर्णय महत्वाचे पाऊल आहे. इतरही समस्या दूर करण्यासाठी शासनाचा प्रतिनिधी या नात्याने आपण कटीबद्ध राहू, असे आश्वासन त्यांनी दिले.याप्रसंगी मंचावर शिवसेनेचे आ. डॉ. संजय रायमूलकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रतापसिंग राजपूत, शिक्षक संघटनेचे वसंतराव गाडेकर, इंजी. रविंद्रसिंग राजपूत, ज्येष्ठ नेते डॉ. जे.बी. राजपूत, मधुसूदन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे बहारदार संचलन प्रा. गोपालसिंग राजपूत यांनी केले. प्रास्ताविकपर मनोगतात डॉ. यु.बी. राजपूत यांनी रावळ समाजाचे बलस्थान असल्याचे सांगितले. तर गाडेकर यांनी जात वैधता प्रमाणपत्राबाबतच्या निर्णयाचे स्वागत करीत यात ना. फुंडकर आणि ना. रावळ यांनी निभावलेल्या भूमिकेबद्दल समाजाच्या वतीने आभार मानले. आभार गजानन इंगळे यांनी केले. डॉ. प्रतापसिंग राजपूत यांनी समाजाने संगठीत होण्याची गरज व्यक्त केली. समाजातील अनेक प्रतिष्ठीतांनी यावेळी ना. रावळ यांचा सस्नेह सत्कार केला. राजपूत सेवा समितीच्या वतीने स्मरणीका रावळ यांना भेट देण्यात आली. याप्रसंगी भगवानसिंग राजपूत, एम.डी. जाधव, जयसिंग चव्हाण, गोपालसिंग राजपूत सागवन, रणजीतसिंग राजपूत, प्रतापसिंग राजपूत, ओमसिंग राजपूत, अजयसिंग राजपूत, सुनिल सोळंकी, गणेश जाधव, नंदु राजपूत, पृथ्वीराज राजपूत, सुधाकर जाधव, दारासिंग पवार, अनिल जगताप, डॉ. साहेबराव सोळंकी, गजेंद्रसिंग राजपूत, जीवनसिंग राजपूत, विजयसिंग राजपूत, सुनिल देवरे, ए.डी. ठेंग, गजाननसिंग मोरे, उद्धव ठेंग, गजानन जाधव, विजयसिंग इंगळे, संजय जाधव तसेच अनेक मान्यवर कार्यक्रमात सहभागी होते.

टॅग्स :cultureसांस्कृतिक