मोताळा तालुक्यात सर्वदूर पावसाची हजेरी!
By Admin | Updated: July 9, 2016 00:15 IST2016-07-09T00:15:31+5:302016-07-09T00:15:31+5:30
तालुक्यात आतापर्यंंत १५४ मि.मी. पावसाची नोंद.

मोताळा तालुक्यात सर्वदूर पावसाची हजेरी!
मोताळा (जि. बुलडाणा) : चातकाप्रमाणे प्रतीक्षा लावून असलेला पाऊस रविवारी तालुक्यात दाखल झाला. रविवारनंतर सोमवारीही पावसाने कुठे मध्यम तर कुठे रिमझिम स्वरूपात सर्वदूर हजेरी लावल्याने शे तकर्यांच्या आशा उंचावल्या आहेत. आतापर्यंत तालुक्यात सरासरी १५४ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. मात्र अद्याप तालुक्यात एकही मोठा पाऊस पडला नसल्याने शेतकर्यांची जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
रविवारी सकाळपासून शहरासह परिसरात तुरळक पावसाला प्रारंभ झाला. मात्र दुपारी चार वाजेपासून तुरळक असलेल्या या पावसाने धामणगाव बढेसह पिंपळगावदेवी, पिंप्रीगवळी, बोराखेडी, राजूर व शेलापूरसह मोताळा मंडळामध्ये बर्यापैकी जोर धरला. सोमवारी पुन्हा दुपारपासून शहरासह तालुकाभरात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. दिवसभर परिसरात अधूनमधून पावसाच्या सरी पडतांना दिसून आल्या. मात्र संध्याकाळी पाचच्या सुमारास पिंपळगाव देवी, िपप्रीगवळी, शेलापूर व मोताळा मंडळात जोरदार तर धामणगाव बढे, रोहिणखेड व राजूर मंडळात हलका पाऊस पडला. कुठे पाऊण तर कुठे तासभर पडलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचल्याचे दिसून आले.
४४ हजार हेक्टरवर पेरणी
गेल्या काही दिवसात तालुकाभरात पडत असलेल्या कमी-अधिक प्रमाणातील पावसावर ४ जुलै अखेर ४४ हजार ३0५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण करण्यात आली आहे. पावसाने ताण दिल्याने धूळ पेरणी करणार्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. मात्र आता पीक जमिनीवर आल्याने शेतकर्यांच्या खरिप हंगामाच्या आशा उंचावल्या आहेत. यंदा पावसाची सुरूवात उशीरा झाल्याने जूनच्या शेवटी व जुलैच्या सुरूवातीला तालुकाभरात पेरणीला वेग आला आहे.