खून प्रकरणातील फरार आरोपी पोलिसांच्या जाळय़ात

By Admin | Updated: November 7, 2014 23:22 IST2014-11-07T23:22:13+5:302014-11-07T23:22:13+5:30

काळेगाव (तपोवन) येथील खून प्रकरण; आरोपीस न्यायालयीन कोठडी.

In absconding case, the police escorted the accused | खून प्रकरणातील फरार आरोपी पोलिसांच्या जाळय़ात

खून प्रकरणातील फरार आरोपी पोलिसांच्या जाळय़ात

मोताळा ( बुलडाणा) : धामणगाव बढे पोलिस स्टेशन अतंर्गत येत असलेल्या काळेगाव (तपोवन) येथील खून प्रकरण व इतर ठिकाणच्या मोटारसायकली चोरी प्रकरणात कुख्यात असलेला विजय ऊर्फ पिंट्या काकर याला धामणगाव बढे पोलिसांनी तेलंगाणा जिल्हा आदिलाबाद येथून ताब्यात घेतले आहे.
या बाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की धा. बढे पोस्टे अंतर्गत काळेगाव तपोवन येथील भगवान कुईटे या इसमावर सन २0११ मध्ये पिंट्या काकर व त्याच्या दोन साथीदारांनी हल्ला करून जबर मारहाण केली होती. या घटनेत उपचारादरम्यान भगवान कुईटे यांचा मृत्यू झाला होता. सदर प्रकरणी धामणगाव बढे पोलिस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी या प्रकरणातील दोन आरोपींना धा. बढे पोलिसांनी अटक केली होती. ते जामिनावर आहेत; मात्र पिंट्या काकर हा तेव्हापासून फरार झाला होता. चोरीच्या व खुनाच्या प्रकरणात तो पोलिसांना अनेक दिवसांपासून वाँटेड होता. काही दिवसांपूर्वी पिंट्या काकर याला तेलंगाणा राज्यातील पोलिसांनी बुलडाणा जिल्हय़ातील १0 मोटारसायकली चोरी करून जवळ बाळगल्याप्रकरणी अटक केली व आदिलाबाद जिल्हय़ातील बोथ तालुक्यांतर्गत हातणूर बाजार पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. आदिलाबादचे जिल्हा पोलिस अधिकारी यांनी याबाबत बुलडाणा जिल्हा पोलिस अधिकारी यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी समीर शेख यांच्या सहकार्याने ठाणेदार सेवानंद वानखडेसह कर्मचारी ताराचंद राठोड व शिवशंकर वायाळ यांनी तेलंगाणा राज्यात जाऊन खून व इतर गुन्हय़ात वाँटेड असलेल्या विजय ऊर्फ पिंट्या काकर याला ताब्यात घेतले. शुक्रवार ७ नोव्हेंबर रोजी या आरोपीला कोर्टासमोर हजर केले असता, न्यायालयीन कोठडी सुनावली गेल्याची माहिती धा. बढे पोलिसांनी दिली आहे.

Web Title: In absconding case, the police escorted the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.