बहुजन भूमिमुक्तीचा ‘आक्रोश’ मोर्चा
By Admin | Updated: July 10, 2015 00:07 IST2015-07-10T00:07:24+5:302015-07-10T00:07:24+5:30
भूमिहीन शेतमजूर रस्त्यावर; नवीन शासन निर्णय काढण्याची मागणी.

बहुजन भूमिमुक्तीचा ‘आक्रोश’ मोर्चा
बुलडाणा : आदिवासी, मागासवर्गीय, बहुजन भूमिहीन अतिक्रमित जमीनधारकावर होणारे अत्याचार थांबविण्यात यावे, १९९१ पासून ते २0१५ पर्यंत बहुजन भूमिहीनांच्या ताब्यातील जमिनीचे पट्टे देण्यासाठी नवीन शासन निर्णय काढावा, या मागणीसाठी बहुजन मुक्ती मोर्चाच्या वतीने सामाजिक न्याय भवनावर ९ जुलै रोजी भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व बहुजन मुक्ती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष भाई प्रदीप अंभोरे ेयांच्यासह भाई बाबूराव सरदार, लक्ष्मण ठोसरे, अतिष खरात, भीमराव खरात, रमेश गाडेकर यांनी केले. यावेळी प्रवक्ता दिलीप जाधव, डॉ.कुरुंगुळ, दीपा पवार, प्रशांत सोनोने, सुभाष घुगे यांची उपस्थिती होती. यावेळी मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. तर संबंधित अधिकार्यांशी शिष्टमंडळाने विविध मागण्यांवर चर्चा करून तातडीने मागण्या पूर्ण करण्यात याव्यात, अशी मागणी केली.