शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

गुरांच्या खरेदी-विक्रीला ‘आधार’ची वेसण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 5:11 PM

Buldhana News पशुपालक आधार नोंदणी करण्यासाठी प्रतिसाद देत नसल्याचे चित्र आहे.

- ब्रम्हानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा: सध्या राज्यभर गुरांचे आधार कार्ड काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतू पशुपालक आधार नोंदणी करण्यासाठी प्रतिसाद देत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आधार नोंदणीअभावी गुरांच्या लसीकरणासही अडचणी येत आहेत. गुरांच्या खरेदी विक्रीलाही आधार कार्ड आवश्यक केले आहे.  त्यामुळे एक प्रकारे गुरांच्या खरेदी विक्रीला ‘आधार’ची  वेसण लावण्यात आल्याचे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही.गुरांचे रक्षण व संगोपनाच्या अनुषंगाने गुरांचेही आधार कार्ड काढण्यात येतात. गायींच्या संरक्षणासाठी ओळखपत्र क्रमांक (यूआयडी) देण्याची ही योजना आहे. त्यामुळे गायींच्या हालचालींचा मागोवा घेणे किंवा त्यांचा ठावठिकाणा शोधून काढणे शक्य होणार आहे. गायींचे वाण, वय, रंग व इतरही बाबींवरही या ‘यूआयडी’मुळे लक्ष ठेवता येईल, या उद्देशाने गुरांचे आधार कार्ड काढण्याचे काम पशुसंवर्धन विभागाकडून राज्यपातळीवर सुरू आहे. गुरांचे आधार नंबर असल्याशिवाय त्यांचे लसीकरण करता येत नाहीत. त्यामुळे लम्पी किंवा इतर अजारांवर लसीकरण करण्यासाठी गुरांचे आधार नंबर विचारण्यात येतात. परंतू ज्या गुरांना आधार नंबर नाही, अशा गुरांचे लसीकरण केल्या जाऊ शकत नाही. त्यामुळे पशुपालकच नव्हे, तर पशुसंवर्धन विभागाचे कर्मचारीही अडचणीत सापडतात. आधार नसल्याने लसीकरण करायचे कसे हा प्रश्न आहे. गुरांची खरेदी विक्रीही आधार कार्ड असल्याशिवाय करण्यात येऊ नये, अशा सुचना आहेत. त्यामुळे पशुपालकांनीही गुरांची खरेदी करण्यापूर्वी त्या गुराचा आधार नंबर घेणे आवश्यक आहे. 

गुरांचे लसीकरण असेल किंवा खरेदी विक्री असेल, या सर्व प्रक्रियेसाठी त्या गुरांची आधार नोंदणी आवश्यक आहे. पत्येक पशुपालकांनी आपल्याकडे असलेल्या सर्व गुरांची आधार टॅगिंग नोंदणी करून घ्यावी.- डॉ. की. मा. ठाकरे, पशुवंर्धन अधिकारी, बुलडाणा. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाAdhar Cardआधार कार्ड