दुचाकी दुरुस्तीच्या बहाण्याने तरुणावर चाकूहल्ला वानखेड येथील तरुण जागीच ठार

By सदानंद सिरसाट | Updated: September 10, 2023 21:26 IST2023-09-10T21:26:31+5:302023-09-10T21:26:46+5:30

तणावपूर्ण शांतता

A youth from Wankhed was killed on the spot in a knife attack on a youth on the pretext of repairing a bike | दुचाकी दुरुस्तीच्या बहाण्याने तरुणावर चाकूहल्ला वानखेड येथील तरुण जागीच ठार

दुचाकी दुरुस्तीच्या बहाण्याने तरुणावर चाकूहल्ला वानखेड येथील तरुण जागीच ठार

वरवट बकाल (बुलढाणा) : संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथे जुन्या वैमनस्यातून चाकूने भोसकून तरुणाचा खून केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. आकाश सुरेश परघरमोर (२४) या अविवाहित तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला. याप्रकरणी त्रिशरण रामदास इंगळे याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

मृत तरुणाची बहीण दीक्षा हिने तामगाव पोलिसात तक्रार दिली आहे. त्यामध्ये मृत तरुण आकाश व आरोपी हे एकमेकांच्या घरासमोरच राहतात. त्यामुळे आरोपीने आकाशला दुचाकी सुरू करण्याच्या बहाण्याने बोलावून घेत त्याला दुचाकीवर बसवले. त्याचवेळी चाकूने छातीवर सपासप वार केल्याचे म्हटले. त्यावेळी आकाश जागेवरच कोसळून त्याचा मृत्यू झाला. त्यावरून पोलिसांनी त्रिशरण रामदास इंगळे (४२) याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३०२, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक केली आहे.

घटनेचे गांभीर्य पाहता वानखेड येथे १० ते १२ पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तामगावचे पोलिस निरीक्षक प्रमोद उलेमाले यांनी तत्काळ घटनास्थळाला भेट दिली. सायंकाळी याप्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली. वृत लिहीपर्यंत मृत आकाशवर अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती.

Web Title: A youth from Wankhed was killed on the spot in a knife attack on a youth on the pretext of repairing a bike