शिवणी येथील तलावात युवक बुडाला; राज्य आपत्ती निवारण पथकाला केले पाचारण
By अनिल गवई | Updated: September 28, 2023 20:34 IST2023-09-28T20:34:25+5:302023-09-28T20:34:43+5:30
- अझहर अली लोकमत न्यूज नेटवर्क संग्रामपूर - गणेश विसर्जनादरम्यान आदिवासी ग्राम शिवणी येथील तलावात एक युवक बुडाल्याची दुर्दैवी घटना ...

शिवणी येथील तलावात युवक बुडाला; राज्य आपत्ती निवारण पथकाला केले पाचारण
- अझहर अली
लोकमत न्यूज नेटवर्क
संग्रामपूर - गणेश विसर्जनादरम्यान आदिवासी ग्राम शिवणी येथील तलावात एक युवक बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना गुरूवारी दुपारी ३ वाजता दरम्यान घडली असून युवक बेपत्ता आहे.
संग्रामपूर तालुक्यातील लाडणापूर येथील ३५ वर्षीय सिद्धार्थ प्रकाश खरगे हा युवक गणेश विसर्जनासाठी गेला होता. दरम्यान शिवणी येथील तलावात तो तीन वाजता बुडाला. चार तासांचा कालावधी उलटल्यानंतरही युवक दिसून आला नाही. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. संग्रामपूरचे तहसीलदार योगेश्वर टोंपे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तलावात बुडालेल्या युवकाला शोधण्यासाठी बुलढाणा येथील राज्य आपत्ती निवारण पथकाला पाचारण करण्यात आल्याची माहिती तहसीलदार योगेश्वर टोंपे यांनी दिली.