अवघ्या तेरा वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या; हिंगणा कारेगाव येथे शोककळा
By अनिल गवई | Updated: March 6, 2024 13:16 IST2024-03-06T13:15:41+5:302024-03-06T13:16:42+5:30
अवघे १३ वर्ष वय असलेल्या एका मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना खामगाव तालुक्यातील हिंगणा कारेगाव येथे उघडकीस आली.

अवघ्या तेरा वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या; हिंगणा कारेगाव येथे शोककळा
खामगाव: अवघे १३ वर्ष वय असलेल्या एका मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना खामगाव तालुक्यातील हिंगणा कारेगाव येथे उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, परशुराम किशोर पाटोळे १३ असे मृतकाचे नाव असून, तो स्वत:च्या राहत्या घरी मंगळवारी दुपारी गळफास घेतलेल्या अवस्थेत मंगळवारी दुपारी आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी त्याला सर्वोपचार रूग्णालयात आणले. तेथे डॉक्टरांनी तपासणी अंती मृत घोषीत केले. त्यानंतर त्याच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी शहर पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, या मुलाने आत्महत्या का केली याचे निश्चित कारण समजू शकले नाही.