गिट्टीखदानमध्ये गुदमरून एका मजुराचा मृत्यू
By अनिल गवई | Updated: November 8, 2023 17:44 IST2023-11-08T17:44:15+5:302023-11-08T17:44:25+5:30
गिट्टी खदानीत क्रशरखाली दबल्याने एका ३७ वर्षीय मजुराचा मृत्यू झाला. ही घटना खामगाव तालुक्यातील धोत्रा उजाड येथे घडली. या घटनेमुळे खामगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

गिट्टीखदानमध्ये गुदमरून एका मजुराचा मृत्यू
खामगाव: गिट्टी खदानीत क्रशरखाली दबल्याने एका ३७ वर्षीय मजुराचा मृत्यू झाला. ही घटना खामगाव तालुक्यातील धोत्रा उजाड येथे घडली. या घटनेमुळे खामगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर असे की, कमलसिंग रामचंद्रसिंग पटेरिया रा.पटवारा, जि.उज्जैन, मध्य प्रदेश हा खामगाव तालुक्यातील धोत्रा उजाड येथील एस.के. स्ट्रोन क्रशरमध्ये कामाला होता. बुधवारी काम करीत असताना, क्रशरखाली दबल्याने गुदमरून मजुराचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी २:४५ वाजतापूर्वी घडली. ही घटना निदर्शनास आल्यानंतर त्याला मृतावस्थेत खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शवागृहात पाठविला. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.