शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमधील दरोडेखोरांची टोळी जेरबंद; खामगाव, यवतमाळ, अकोल्यात केले होते गुन्हे  

By निलेश जोशी | Updated: March 20, 2023 19:12 IST

खामगाव, यवतमाळ, अकोल्यात गुन्हे करणाऱ्या गुजरातमधील दरोडेखोरांच्या टोळीला जेरबंद करण्यात आले आहे. 

बुलढाणा : गुजरातमधून येऊन विदर्भात दरोड्याच्या गुन्ह्यासह बॅग लिफ्लिटंग करत रोख रक्कम चोरण्यात तरबेज असलेल्या गुन्हेगारांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. दरम्यान त्यांच्या अटकेमुळे आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. सोबतच विदर्भात आगामी १५ दिवस थांबून गुन्हे करण्याच्या ते तयारीत होते असे पोलिसांच्या तपासात समोर आले. या टोळीतील तीन जणांना अटक करण्यात आली असून, ७ जण अंधाराचा फायदा घेत शेगाव मधून फरार झाले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये अजयकुमार अशोकभाई तमंचे (४२), जिग्नेश दिनेश घासी (४४) आणि रितीक प्रवीण बाटुंगे (२३, सर्व रा. कुबेरनगर, अहमदाबाद (गुजरात) यांचा समावेश आहे. त्यांचे सात सहकारी १७ मार्च रोजी अंधाराचा फायदा घेत शेगाव येथील आनंद सागर लगतच्या पट्ट्यातून पसार झाले. पोलिस सध्या त्यांचा शोध घेत आहेत.

खामगाव शहरात १६ मार्च रोजी गांधी चौकात एका व्यक्तीच्या दुचाकीच्या डिक्कीतून ६ लाख रुपये चोरून नेण्यात आले होते. या प्रकरणाच्या तपासात एक कार व एका दुचाकीवर सहा व्यक्तींनी पाठलाग करत खामगावातील त्या व्यक्तीच्या दुचाकीच्या डिक्कीतून पैसे पळवल्याचे समोर आले होते. गोपनीय महिती व तांत्रिक विश्लेषणानंतर या आरोपींनी अकोला आणि यवतमाळ येथेही बॅगलिफ्टिंग केल्याचे समोर आले होते. आरोपींच्या शोधासाठी खामगाव, शेगाव येथे लॉज, रेल्वे स्टेशनसह संशयितांची तपासणी स्थानिक गुन्हे शाखेने सुरू केली होती. 

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शेगाव येथे पेट्रोलिंग करत असताना आनंद सागर परिसरात दुचाकी व एका कारसह काही जण संशयितरीत्या थांबलेले असल्याचे समोर आले होते. त्या आधारावर या पथकाने तेथे जाऊन तीन जणांना ताब्यात घेतले होते. वाहनाची तपासणी केली असता त्यात लोखंडी टी की, दोन चाकू, चार पेचकस, कैची, मिरची पावडर नगदी ८५ हजार ८०० रुपये व अन्य साहित्य मिळून आले. पोलिसांनी जीजे-१-आरअेा-६८८२ क्रमांकाची कार आणि एमएच-३०-बीपी-४२१८ क्रमांकाची दुचाकीसह ६ लाख ७६ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात  घेतला आहे. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारीArrestअटकtheftचोरी