खामगाव - कुत्र्याचे मागचे पाय धरून त्याला निर्दयीपणे फिरविणाऱ्या दोन युवकांच्या चांगलेच आंगलट आले आहे. तक्रारीवरून या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खामगाव येथील तलाव रोड भागातील रहिवासी पिपल फॉर अॅनिमल संस्थेच्या अध्यक्ष तथा अॅनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडियाच्या मानद पशु अधिकारी सुनिता आयलाणी (३९) या २२ मार्चच्या रात्री ११ वाजता बैठक आटोपून घरी येत होत्या. यावेळी शहरातील गौतम चौकात एक युवक कुत्र्याचे मागील दोन पाय धरुन निर्दयीपणे फिरवताना आढळून आला. तर त्याच्या सोबतचे युवक मोबाईलवर शुटींग काढत होते. हा प्रकार पाहून उद्विग्न सुनिता आयलानी यांनी याबाब त्या युवकाला हटकले. त्यावेळी युवक तेथून पळून गेला तर दुसऱ्या एका युवकाने तेथे येवून त्यांना शिवीगाळ करत धमकी दिली. याप्रकरणी सुनिता आयलाणी यांनी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून शहर पोलिसांनी दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.
कुत्र्याचे पाय धरुन निर्दयीपणे फिरवणे भोवले, दोघांवर गुन्हा दाखल
By अनिल गवई | Updated: March 24, 2023 18:11 IST