शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गावर दुभाजकाला धडकून कारने घेतला पेट, दोघांचा होरपळून मृत्यू, एक गंभीर जखमी

By निलेश जोशी | Updated: May 29, 2023 09:35 IST

बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड गावानजीकची घटना: जखमीवर मेहकरमध्ये उपचार सुरू

बुलढाणा: समृद्धी महामार्गावर सिंदखेड राजा नजीक असलेल्या दुसरबीड जवळ मेहकरकडून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जाणारी कार दुभाजकाला धडकून अचानक कारने पेट घेतला. त्यात होरपळून कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान कारमधील तिसरा व्यक्ती अपघातादरम्यान कारच्या बाहेर फेकल्या गेल्याने थोडक्यात बचावला असला तरी तो गंभीर जखमी आहे. हा अपघात २९ मे रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडला.

मेहकरकडून एमएच ०२-सीआर-१४५९ क्रमांकाची कार ही मुंबई कॅरिडॉरच्या दिशेने जात असताना दुसरबीड गावानजीक ही कार पहाटे ५:४५ वाजेच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील मिडीयम मधील सिमेंटच्या रस्ता दुभाजकावर धडकली. त्या पाठोपाठ कारने पेट घेतला. त्यात कारमधील दोघा जणांचा होरपळून मृत्यू झाला तर अजय दिनेश भिलाला (२२, रा. मोहन बडोदिया, जि. शाजापूर, मध्य प्रदेश) हा व्यक्ती अपघातादरम्यान कारच्या बाहेर फेकल्या गेल्यामुळे थोडक्यात बचावला. परंतू तो गंभीर जखमी आहे. त्यास मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.कारने जागेवरच घेतला पेट

अपघातानंतर कारने जागेवरच पेट घेतला. या कारमध्ये डिझेलने भरलेल्या ७ ते ८ कॅन होत्या. कारने पेट घेताच त्यांचाही भडका उडाला आणि कारमधील दोघांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. दरम्यान मृत पावलेल्या या दोघांची अद्याप अेाळख पटलेली नाही.१० मिनीटात पोहोचली मदत

पहाटे ५:४५ वाजेच्या सुमारास कार अपघात व कारने पेट घेतल्याची माहिती महामार्ग पोलिसांना ५:५० वाजताच्या सुमारास कळाली. त्यामुळे तातडीने एपीआय अरुण बकाल, पोलिस उपनिरीक्षक राजू गायकी, पोलिस हेडकॉन्स्टेबल गोविंदा उबरहंडे, नायक पोलिस कॉन्स्टेबल विठ्ठल काळुसे, मिलिंद ताकतोडे, विनोद राठोड यांनी अवघ्या दहा मिनीटात अपघातस्थळ गाठले. मात्र तोवर कारमधील दोघांचा आगीत जळून कोळसा झाला होता. जखमी अजय दिनेश भिलाला यास रुग्णवाहिकेद्वारे त्वरित मेहकर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघातामध्ये मृत पावलेल्या दोघांचे पार्थिव रुग्णालयात पाठविण्यातआले आहे. अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAccidentअपघात