ट्रक्टरच्या धडकेत ९ वर्षीय मुलगा ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2017 20:11 IST2017-05-31T20:11:22+5:302017-05-31T20:11:22+5:30
अमडापूर : येथून जवळच असलेल्या चिखली तालुक्यातील चांधई येथे ९ वर्षीय मुलास ट्रॅक्टरने धडक दिल्याने मुलगा जागीच ठार झाल्याची घटना ३१ मे रोजी सकाळी ९ वाजता घडली.

ट्रक्टरच्या धडकेत ९ वर्षीय मुलगा ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
अमडापूर : येथून जवळच असलेल्या चिखली तालुक्यातील चांधई येथे ९ वर्षीय मुलास ट्रॅक्टरने धडक दिल्याने मुलगा जागीच ठार झाल्याची घटना ३१ मे रोजी सकाळी ९ वाजता घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अमडापूर पो.स्टे.ला भारत भिमराव तवर (वय ४३) रा.चांधई यांनी तक्रार दिली की, त्यांचा भाचा आशिष श्रीधर मोरे (वय ९ वर्षे) रा.दिवठाणा ३१ मे रोजी सकाळी ९ वाजता गावाजवळ रोडने येत असता आरोपी फकीरा रामचंद्र वाघमारे रा. चांधई याने त्याचे ताब्यातील महिंद्रा सरपंच ट्रॅक्टर भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून भाचा आशिष याला जबर धडक दिली. त्यामध्ये तो जागीच ठार झाला आहे, अशी तक्रार भारत भिमराव तवर वय ४३ रा.चांधई यांनी दिल्यावरून आरोपी चालक फकीरा रामचंद्र वाघमारे याचे विरूध्द अप नं. १३६/१७ कलम २७९, ३३७, ३०४ अ प्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपास ठाणेदार गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ राजेश गवई हे करीत आहेत.