अपघातात ९ अंगणवाडी सेविका जखमी

By Admin | Updated: July 17, 2017 01:58 IST2017-07-17T01:58:18+5:302017-07-17T01:58:18+5:30

बुलडाणा: नागपूर-अमरावती महामार्ग क्र.६ वर शनिवारी दुपारी चारच्या सुमारास कारला ट्रकने दिलेल्या धडकेत बुलडाणा जिल्ह्यातील कारमधील ९ मोर्चेकरी अंगणवाडी सेविका जखमी झाल्या.

9 injured in Anganwadi road accident | अपघातात ९ अंगणवाडी सेविका जखमी

अपघातात ९ अंगणवाडी सेविका जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: नागपूर-अमरावती महामार्ग क्र.६ वर शनिवारी दुपारी चारच्या सुमारास कारला ट्रकने दिलेल्या धडकेत बुलडाणा जिल्ह्यातील कारमधील ९ मोर्चेकरी अंगणवाडी सेविका जखमी झाल्या.
नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरावर धडक मोर्चा घेऊन मेहकर येथील ९ मोर्चेकरी अंगणवाडी सेविका वेतनवाढीच्या मागणीसाठी गेल्या होत्या. मोर्चा संपल्यावर गाडीने मेहकरकडे निघाल्या असता अमरावती मार्गावरून हिंगणा बायपासमार्गे वळणमार्गावर ट्रकच्या चालकाने गाडीला जोरदार धडक दिली. यात मेहकर येथील मीनाक्षी चौहान (३५ वर्ष), मीना पवार (३२), संगीता पवार (३७), चंद्रकला सपकाळ (४०), लता व्यवहारे (४०), संगीता महालनकर (४५), रेखा बिंबे (४०), सिंधू सांगाडे (२८), गाडीचालक जाफर खान (२०) हे जखमी झाले.

Web Title: 9 injured in Anganwadi road accident