कोलोरी शिवारात ९ बैल मृत आढळले
By Admin | Updated: August 23, 2016 23:45 IST2016-08-23T23:45:33+5:302016-08-23T23:45:33+5:30
खामगाव-चिखली मार्गावर बैलांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची शक्यता.

कोलोरी शिवारात ९ बैल मृत आढळले
खामगाव,(जि. बुलडाणा) दि. २३ : कोलोरी शिवारात मंगळवारी ९ बैल मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. खामगाव-चिखली मार्गावरील अंत्रज शिवारात सोमवारी १३ बैल मृतावस्थेत पडलेले होते. या बैलांचा वाहतुक करताना वाहनामध्ये गुदमरून मृत्यू झाल्याचे समजते. या मृत बैलांवर ग्रामीण पोलिसांनी अंत्यसंस्कार करून अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची शाई वाळते न वाळते तोच राष्ट्रीय महामार्गावरील कोलोरी शिवारात मंगळवारी ९ बैल मृतावस्थेत पडलेले आढळले. या बैलाचाही वाहनातून वाहतुक करताना गुदमरून मृत्यू झाला आहे.