शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
7
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
8
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
9
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
10
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
11
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
12
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
13
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
14
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
16
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
17
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
18
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
19
विना नंबरप्लेटच्या भरधाव पोर्शे गाडीने तरुण तरुणीला उडवले; दोघांचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटना
20
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती

जिल्हा नियोजन समितीसाठी ९७.२३ टक्के मतदान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2017 1:17 AM

बुलडाणा :  जिल्हा नियोजन समिती निवडणूक २0१७ साठी ८ ऑगस्ट २0१७ रोजी मतदान पार पडले.जिल्ह्यात एकूण ९७.२३ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात सर्वत्र शांततेत व उत्साहात मतदान झाले. या निवडणुकीसाठी १४ मतदान केंद्रांची व्यवस्था होती. त्यामध्ये बुलडाणा तहसील कार्यालयात दोन मतदान केंद्र होती. त्यापैकी एक जिल्हा परिषद सदस्य मतदारांकरिता, तर एक नगर परिषद सदस्य मतदारांकरिता होते. संबंधित तालुक्याच्या तहसील कार्यालयात नगर परिषद सदस्य   मतदारांकरिता  मतदान केंद्राची व्यवस्था होती. 

ठळक मुद्दे३६१ मतदार, स्त्री मतदार २0४ व पुरूष १५७ मतदार१४ मतदान केंद्रांवर पार पडले मतदान शिवसेनेचे सहा सदस्य अविरोध 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  जिल्हा नियोजन समिती निवडणूक २0१७ साठी ८ ऑगस्ट २0१७ रोजी मतदान पार पडले.जिल्ह्यात एकूण ९७.२३ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली.जिल्ह्यात सर्वत्र शांततेत व उत्साहात मतदान झाले. या निवडणुकीसाठी १४ मतदान केंद्रांची व्यवस्था होती. त्यामध्ये बुलडाणा तहसील कार्यालयात दोन मतदान केंद्र होती. त्यापैकी एक जिल्हा परिषद सदस्य मतदारांकरिता, तर एक नगर परिषद सदस्य मतदारांकरिता होते. संबंधित तालुक्याच्या तहसील कार्यालयात नगर परिषद सदस्य   मतदारांकरिता  मतदान केंद्राची व्यवस्था होती.   या निवडणुकीकरिता स्त्री २0४ व पुरूष १५७ मतदार होते. अशाप्रकारे एकूण मतदारसंख्या ३६१ होती. त्यापैकी बुलडाणा (नागरी), चिखली, दे.राजा, सिं.राजा, लोणार, मेहकर, खामगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद, नांदुरा, मोताळा व मलकापूर मतदान केंद्रावर १00 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली; मात्र मोताळा ९४.१२, शेगाव ९६.३0 व बुलडाणा (ग्रामीण) येथे ८६.६0 मतदानाची नोंद करण्यात आली.जिल्ह्यातील बुलडाणा (ग्रामीण)  मतदान केंद्रावर स्त्री- २९, पुरूष २३, बुलडाणा (नागरी) : स्त्री १८ व पुरूष ११, चिखली : स्त्री १४ व पुरूष १३, दे.राजा : स्त्री १२ व पुरूष ७, सिं.राजा : स्त्री १0 व पुरूष ७, लोणार : स्त्री ९ व पुरूष ८, मेहकर : स्त्री १३ व पुरूष १२, खामगाव : स्त्री १८ व पुरूष १६, संग्रामपूर : स्त्री ९ व पुरूष ८, जळगाव जामोद : स्त्री १0 व पुरूष ९, नांदुरा : स्त्री १५ व पुरूष ९, मलकापूर : स्त्री १४ व पुरूष १५, मोताळा : स्त्री १0 व पुरूष ६,  शेगांव : स्त्री १५ व पुरूष ११ मतदारांनी मतदान केले. निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे सर्वांना उत्सुकता लागून आहे. 

शिवसेनेचे सहा  सदस्य अविरोध जिल्ह्याच्या विकासात्मक बाबीवर आढावा घेऊन उपाययोजना आखणार्‍या जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचे सहा सदस्य अविरोध निवडून आल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख जालींधर बुधवत यांनी दिली. या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्यांमधून शिवसेनेच्या ४ जागा तर न.प.च्या नागरी भागामधून २ जागा अविरोध निवडून आल्या आहेत. यामध्ये जि.प.मधून सर्वसाधारण महिला प्रवर्गातून कमलाताई जालींधर बुधवत, सर्वसाधारणमधून शरद दत्तात्रय हाडे, अनुसूचित जातीमधून शीलाताई धनशीराम शिंपणे, ना.मा.प्र.महिलामधून रेणुका दिलीप वाघ या तसेच न.पा.च्या ना.मा.प्र. मधून नंदन अशोक खेडेकर व ना.मा.प्र. महिलामधून पुष्पाताई शिवाजीराव धुड यांची अविरोध निवड झाली आहे.